एक्स्प्लोर
CBSE Result : सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल जाहीर, 13 विद्यार्थ्यांना 500 पैकी 499 गुण
महाराष्ट्राचा समावेश असलेला चेन्नई विभागाचा निकाल 99 टक्के इतका लागला आहे.
नवी दिल्ली : सीबीएसई(केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) तर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या परीक्षेत तब्बल 13 विद्यार्थ्यांना 500 पैकी 499 गुण मिळाळे आहेत. यंदा सीबीएसई दहावीचा निकाल 91.1 टक्के लागला आहे.
आज दुपारी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर दहावी परीक्षेचा हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेनंतर 38 दिवसांत हा निकाल लावण्यात आला आहे. देशभरातील 17 लाख 61 हजार 78 विद्यार्थ्यांनी यंदा सीबीएसईची दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 16 लाख 4 हजार 428 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. cbse.nic.in, cbseresutls.nic.in या वेबसाईटवर हा निकाल उपलब्ध आहे.
सीबीएसईच्या या परीक्षेत 13 विद्यार्थ्यांना 500 पैकी 499 गुण मिळाले आहेत. तर 25 विद्यार्थ्यांना 500 पैकी 498 गुण मिळाले आहेत. यंदा सीबीएसईच्या निकालात त्रिवेंद्रम विभागानं बाजी मारली आहे. त्रिवेंद्रम विभागाचा निकाल 99.85 टक्के इतका लागला आहे. महाराष्ट्राचा समावेश असलेला चेन्नई विभाग 99 टक्क्यांसह दुसऱ्या, 95.89 टक्क्यांसह अजमेर तिसऱ्या क्रमांकावर आहे.Total pass percentage in CBSE Class-10th Exams is 91.1 %; Trivandrum (99.85%), Chennai (99%), Ajmer (95.89%) are top three regions. pic.twitter.com/JBpHZGF0q1
— ANI (@ANI) May 6, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement