एक्स्प्लोर
Advertisement
लालू प्रसाद यादव यांच्यासह पत्नी, मुलावर सीबीआयकडून गुन्हा
नवी दिल्ली : माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या मालमत्तांवर सीबीआयने छापेमारी केली आहे. लालू प्रसाद यादव यांच्यासह पत्नी राबडी देवी, मुलं आणि इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लालूप्रसाद यादव 2006 साली रेल्वेमंत्रीपदी रुजू झाले होते. रेल्वेमंत्री असताना रांची आणि पुरीमधल्या हॉटेल्सना निविदा देताना केलेल्या घोटाळ्यांच्या आरोपानंतर छापेमारी करण्यात आली.
दिल्ली, रांची, पुरी, पाटणा, गुरुग्राम यासारख्या 12 ठिकाणी सीबीआयने छापे टाकले आहेत. सीबीआयने
लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, मुलगा, तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक, आयआरसीटीसी,
खाजगी कंपनीचे दोन संचालक, खाजगी मार्केटिंग कंपनी आणि काही अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
2006 मध्ये रांची आणि पुरीमधील हॉटेल्सचा विकास, देखभाल आणि इतर कामकाजांच्या निविदा एका खाजगी कंपनीला दिल्याच्या आरोपातून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement