Mucormycosis : तुमचा मास्क बनू शकतो का ब्लॅक फंगसचं कारण? एक्सपर्ट काय सांगतात?
कोरोनामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते. यात जर रुग्णाला शुगर असेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्याने स्टिरॉइड्स घेतले तर ब्लॅक फंगसचा या रुग्णावर अॅटॅक होण्याची जास्त शक्यता असते.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसनंतर म्यूकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस ही देशासाठी चिंतेची बाब बनलं आहे. ब्लॅक फंगसमुळे (काळी बुरशी) कोरोनाने बाधित झालेल्या किंवा त्यातून बरे झालेल्यांच्या नाक, डोळे, सायनस आणि काही केसेसमध्ये लोकांच्या मेंदूला देखील नुकसान होत आहे. ब्लॅक फंगसबद्दल लोकांमध्ये जागरूकता अजूनही कमी आहे. एबीपी न्यूजने या आजाराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी एम्स, दिल्ली येथील न्यूरोलॉजिस्ट डॉ. मंजरी त्रिपाठी यांच्याशी बातचित केली.
डॉ. मंजरी त्रिपाठी यांनी सांगिंतलं की, फंगसचं आपल्या वातावरणात अस्तित्व असतं. जेव्हा आपण निरोगी असतो तेव्हा या फंगसमुळे आपले काहीही नुकसान होत नाही. परंतु जेव्हा आपण एखाद्या रोगाने ग्रस्त होतो, त्यावेळी आपली प्रतिकारशक्ती कमी होते त्यावेळी ही बुरशी आपल्यावर हल्ला करते. कोरोनामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते. यात जर रुग्णाला शुगर असेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्याने स्टिरॉइड्स घेतले तर ब्लॅक फंगसचा या रुग्णावर अॅटॅक होण्याची जास्त शक्यता असते.
Mucormycosis : म्युकरमायकोसिससाठीही आता साथीचे रोग नियंत्रण कायदा लागू
डॉ. त्रिपाठी पुढे म्हणाल्या की, ब्लॅक फंगसपासून वाचायचं असेल तर सतर्क राहणे फार महत्वाचे आहे. जर नाकाभोवती सूज किंवा लाल रंग दिसत असेल किंवा डोळ्यांमध्ये सूज येत असेल किंवा नाकाच्या आत कवच असेल तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवा.
मास्क आणि ब्लॅक फंगस
या आजारात स्वच्छतेची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. जेव्हा आपण मास्क घालतो तेव्हा आपल्याला नाक आणि तोंडाभोवती जास्त घाम येतो, ज्यामुळे मास्क ओला होतो. या ओलाव्यामुळे फंगस झपाट्याने पसरतो. म्हणून आपण आपला मास्क स्वच्छ ठेवणे गरजेच आहे. शक्य आपल्यासह जास्त मास्क बाळगणे फार महत्वाचे आहे. सात दिवसांसाठी वेगवेगळे सात मास्क ठेवले तर उत्तमच. मास्क वापरल्यानंतर ते स्वच्छ धुवा आणि उन्हात चांगला कोरडा करा. तसेच तोंड स्वच्छ ठेवा. तोंड धुणे, दात नियमित घासणे खूप महत्वाचे आहे. डॉक्टरांशिवाय कोणतेही औषध घेऊ नका, असं डॉ. त्रिपाठी यांनी सांगितलं.