एक्स्प्लोर

CAG Report : कॅगच्या रिपोर्टमुळे मोदी सरकारच्या योजनांवर प्रश्नचिन्ह? आयुषमान भारत ते द्वारका एक्सप्रेसवे 7 योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा विरोधकांचा दावा

CAG Report : कॅगच्या रिपोर्टमुळे सध्या मोदी सरकारच्या काही योजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. तसेच काँग्रेस, आपनं याच अहवालाचा आधार घेत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.

CAG Report :  द्वारका एक्सप्रेसवे (Dwarka Expressway) ते आयुषमान भारत, अयोध्या डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ते भारतमाला परियोजना कॅगच्या (CAG) या अहवालांचा हवाला देत काँग्रेसनं (Congress) मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. देशाचे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल अर्थात कॅगचा हा अहवाल नुकताच संसदेच्या (Parliament) पटलावर ठेवण्यात आला आहे. त्याचा आधार घेत काँग्रेसनं मोदींवर सर्वात मोठा हल्लाबोल केलाय.

दरम्यान पंतप्रधान मोदी (Narendra Modi) भ्रष्टाचाराविरोधात लढाई लढत असल्याचा आव आणतात, मग आता या गैरव्यवहारांवर काही बोलणार का, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स चे अध्यक्ष पंतप्रधान मोदी आहेत त्यांच्याच परवानगीमुळे या प्रकल्पांना मंजुरी मिळते मग आता याची जबाबदारी ते घेणार का असा सवाल काँग्रेस विचारण्यात येत आहे. 

मोदी सरकारच्या 'या' योजनांवर प्रश्नचिन्ह

दिल्लीतल्या द्वारका एक्सप्रेस वे च्या कामात प्रतिकिलोमीटरसाठी 18 कोटी रुपयांची मंजुरी असताना 250 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा कॅगचा अहवालात करण्यात आला आहे. तर रस्ते विकासासाठी केंद्राच्या भारतमाला परियोजनेत 15 कोटी रुपये प्रति किमी ऐवजी 32 कोटी रुपये प्रति किमी खर्च केला गेला, टेंडरची प्रक्रियाही नियमानं पार पडली नसल्याचा दावा कॅगने केला आहे.

दक्षिणेतल्या पाच राज्यांमधे नमुना म्हणून टोलचा सर्व्हे करण्यात आला, त्यात 132 कोटी रुपये जनतेकडून अधिकचे वसूल केल्याचा ठपका कॅगने मोदी सरकारवर ठेवला आहे. आयुषमान भारत योजनेत एकच मोबाईल नंबर असलेले 7.5 लाख लाभार्थी कसे हा सवाल कॅगच्या अहवालामध्ये विचारण्यात आला आहे. ग्रामीण विकासाच्या योजनेअंतर्गत महिला, विधवा, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी अपेक्षित असलेला खर्च सरकारी जाहिरातींकडे वळवला गेल्याचा दावा या अहवालामध्ये करण्यात आला आहे. अयोध्या विकास प्रकल्पात कंत्राटदारांना अवाजवी नफा झाला असल्याचं या अहवालामध्ये सांगण्यात आलं आहे. 

कॅगच्या या आरोपांमधील द्वारका एक्सप्रेसवे, भारतमाला परियोजनेवरचे हे आरोप नितीन गडकरींच्या खात्याशी संबंधित आहेत. एकीकडे रस्तेविकासाची गती वाढल्याचा दावा होत असतानाच हे आरोप सरकारवर करण्यात येत आहेत. याआधी 2015 मध्येही कॅगच्या अहवालामध्ये गडकरींचं नाव आलं होतं. एका खासगी कंपनीला नियमाबाह्य कर्ज दिल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला होता. पण हे सगळे आरोप गडकरींना फेटाळले होते. आताही कॅगने विचारलेल्या या प्रश्नांवर गडकरींच्या खात्याकडून अद्यापही स्पष्टीकरण आलेलं नाही.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचं म्हणणं की हे आकडे चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आले आहेत. दिल्ली ते गुरुग्राम दरम्यानचा हा द्वारका एक्सप्रेस वे 8 लेनचा एलिव्हेटड रोड आहे. या संपूर्ण कामाच्या दरम्यान कमीत कमी एन्ट्री, एक्झिट पॉईंटस असावेत या हेतूनं त्याची तशा प्रकारे बांधणी करणं आवश्यक होतं असं सागंण्यात येत आहे.  तर मोदी सरकारने भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड तोडून टाकल्याची टीका आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. कॅगच्या अहवालातले सगळे ठपके पाहिले तर 7.5 लाख कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याची टीका आपचे खासदार संजय सिंह यांनी केली आहे. 

कोण आहेत कॅग?

यूपीएच्या काळात याच कॅगच्या रिपोर्टने खळबळ उडवून दिली होती. तेव्हा विनोद रॉय हे कॅग होते. 2 जी घोटाळ्यात तब्बल 1 लाख 76 हजार कोटी रुपयांचा आकडा तेव्हा समोर आला होता. आता आता देशाचे कॅग आहेत गिरीश मुर्मू आहेत.  गिरीश मुर्मू हे गुजरात केडरचे आयएएस अधिकारी आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये त्यांनी कॅग म्हणून पदभार स्वीकारला होता. त्याआधी जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल म्हणून ते काम पाहत होते. गुजरातमध्ये काम करताना मोदींच्या विश्वासातली अधिकारी अशी त्यांची ओळख होती. 

सध्या या कॅगच्या अहवालावरुन विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे. कॅगचा हा अहवाल  संसदेच्या पटलावर ठेवला जात असतो. संसदेच्या पटलावर ठेवल्या जाणाऱ्या कुठल्याही आकडेवारीला अधिकृततेचा दर्जा असतो, त्याला गांभीर्यानं पाहिलं जातं. पण यूपीए सरकारच्या काळात कॅगवरुन जितकं राजकीय वादळ उठलं होतं तितकं आता मात्र उठताना दिसत नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता यावर सरकारकडून काय स्पष्टीकरण देण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

हेही वाचा : 

Vishwakarma Yojana : विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात 18 पारंपरिक उद्योगांचा समावेश, 13 हजार कोटींचा खर्च अपेक्षित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
×
Embed widget