एक्स्प्लोर

आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना दहा टक्के आरक्षण, मोदी सरकारचा निर्णय

आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या 49 टक्के आरक्षणाच्या कोट्यात वाढ करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांसाठी मोदी सरकारने अत्यंत दिलासादायक बातमी आणली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्ण समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. यासाठी मोदी सरकार घटनादुरुस्ती करुन आरक्षण कोट्यात वाढ करणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या 49 टक्के आरक्षणाच्या कोट्यात वाढ करण्यात येणार आहे. परिणामी आरक्षणाचा कोटा 49 टक्क्यांवरुन 59 टक्क्यांवर पोहचेल. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्ण वर्गाला फायदा होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. कोणकोणत्या समाजाला फायदा? आतापर्यंत महाराष्ट्रात मराठा, धनगर, मुस्लिम किंवा राज्याबाहेर पटेल, जाट, गुर्जर समाजाकडून आरक्षणासाठी मागणी होत आहे. या सर्वांची एकत्रित डोकेदुखी कमी करण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं. ब्राह्मण, ठाकूर, भूमिहार, कायस्थ, बनिया, जाट, गुजर समाजाला या आरक्षणाचा फायदा होणार आहे. शिक्षण आणि नोकरीमध्ये हे आरक्षण दिलं जाईल. सरकार यासंबंधीची घटनादुरुस्ती उद्या संसदेत मांडणार आहे. हिवाळी अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे. मोदी सरकारने 2018 मध्ये एससी/एसटी कायद्यात ज्याप्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला होता, त्यामुळे सवर्णांमध्ये नाराजी होती. आता घटनादुरुस्ती करुन आरक्षणाचा कोटा वाढवून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील आरक्षण अनुसूचित जाती/जमाती 20 टक्के इतर मागासवर्गीय (ओबीसी) 19 टक्के भटके, विमुक्त समाज 11 टक्के विशेष मागासवर्ग (एसबीसी) 2 टक्के (मराठा 16 टक्के)* परिच्छेद 15 आणि 16 मध्ये घटनादुरुस्ती मोदी सरकार हे आरक्षण आर्थिक निषकांवर देण्याच्या विचारात आहे, ज्याची सध्या संविधानात तरतूद नाही. संविधानात समाजाच्या मागासलेपणावर आरक्षण देण्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती करणं गरजेचं आहे. यासाठी संविधानाच्या परिच्छेद 15 आणि परिच्छेद 16 मध्ये बदल केले जातील. दोन्ही परिच्छेदांमध्ये बदल करुन आर्थिकदृष्ट्या आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होईल. कोटा मंजूर, पण इतर पक्षांचं समर्थन मिळणार? केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांसाठी 10 टक्के आरक्षणाचा कोटा तर मंजूर केला. पण तो लागू करण्याचा मार्ग अजूनही कठीण आहे. सरकारला यासाठी घटनादुरुस्ती करणं गरजेचं आहे. पण महत्त्वाचं म्हणजे सरकारला यासाठी संसदेत इतर पक्षांचं समर्थनही आवश्यक आहे. 'निक्काला'नंतर केंद्राकडून शेतकऱ्यांची 4 लाख कोटींची कर्जमाफी? यापूर्वी, मोदी सरकार देशभरातील शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्याची शक्यता वर्तवली जात होती. सुमारे चार लाख कोटी रुपयांचं कृषीकर्ज माफ करण्याची घोषणा केंद्राकडून होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर सर्व समाजघटकांना चुचकारण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असल्याचं दिसत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 05 January 2025Suresh Dhas on Santosh Deshmukh | संतोष देशमुखांच्या हत्येचा कट मे महिन्यात शिजला, सुरेश धसांचा दावाBangladeshi Rate Card | बांगलादेशींना भारतात येण्यासाठी दलालांना द्यावे लागतात 7-8 हजार रूपयेABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 05 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
China World Largest Dam On Brahmaputra River : ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
Embed widget