एक्स्प्लोर
सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय, सोनिया गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले की, जामियामध्ये पोलिसांनी केलेली कारवाई अत्यंत चुकीची आहे. तसेच सोनिया गांधींनी पुढे बोलताना सांगितले की, सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.
![सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय, सोनिया गांधींचा मोदी सरकारवर निशाणा CAA Sonia gandhi slams modi govt jamia millia islamia is wrong opposition leaders meet president सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय, सोनिया गांधींचा मोदी सरकारवर निशाणा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/17185539/soina-gandhi01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात संपूर्ण देशभरात असंतोषाची लाट उसळली आहे. याच मुद्यावरून जामीया मिलिया विद्यापीठातही हिंसाचार उसळला होता. अलीगड मुस्लीम विद्यापीठात तणाव वाढला होता. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. अशातच विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीहल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही याप्रकरणी निषेध व्यक्त केला आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जामीया मिलिया विद्यापीठात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी विरोधी पक्ष नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले की, जामियामध्ये पोलिसांनी केलेली कारवाई अत्यंत चुकीची आहे. तसेच सोनिया गांधींनी पुढे बोलताना सांगितले की, सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.
पाहा व्हिडीओ : सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय : सोनिया गांधी
राष्ट्रपतींच्या भेटीनंतर मोदी सरकारवर टीका करत सोनिया गांधी म्हणाल्या की, कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. अत्यंत कठोर भूमिका मोदी सरकारने घेतली आहे. ईशान्य भारतात सुरू झालेली ही आंदोलनं आता संपूर्ण भारतात होताना दिसत आहेत. ही आंदोलनं आणखी पसरू शकतात. हिंसाचार रोखण्यासाठी पोलिंसानी केलेली कारवाई त्रासदायक आहे. दिल्लीतील महिला वसतीगृहात पोलीसांनी शिरून विद्यार्थिनींना खेचून बाहेर काढलं. तसेच निर्दयतेनं त्यांना मारहाणही केली.'
दरम्यान, दिल्लीमधील जामिया विद्यापीठ आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठात करण्यात आलेल्या पोलीस कारवाईविरोधात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी इंडिया गेटवर ठिय्या आंदोलन केलं होतं. प्रियंका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, ए के अँटनी यांच्यासहित अनेक ज्येष्ठ नेतेही आंदोलनाला बसले होते. त्यांनी जवळपास दोन तास ठिय्या आंदोलन केलं. तसेच देश गुंडांच्या मालकीचा नाही असं म्हणत प्रियंका गांधी आक्रमक झाल्या होत्या.
संबंधित बातम्या :
दिल्लीतील आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण, अनेक ठिकाणी तोडफोड तर पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर
सर, तुमची आयटी सेल खरी तुकडे-तुकडे गँग; रेणुका शहाणेचा मोदींच्या ट्वीटला रिप्लाय
Jamia Protests | जामिया हिंसाचारप्रकरणी दहा जण अटकेत, एकही विद्यार्थी नाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
बातम्या
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)