एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सी व्होटर सर्व्हे: मोदी पुन्हा लोकसभा जिंकणार
आजही देशात मोदींचा करिष्मा कायम असल्याचं या सर्व्हेत म्हटलं आहे.
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी वर्ष-दीड वर्ष राहिले आहेत. मात्र आज देशाचा मूड काय हे सी व्होटरने जाणून घेतलं आहे. सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेनुसार आज निवडणुका झाल्या तर पुन्हा एकदा मोदींची सत्ता येऊ शकते.
आजही देशात मोदींचा करिष्मा कायम असल्याचं या सर्व्हेत म्हटलं आहे.
पंतप्रधानपदासाठी 63 टक्के लोकांनी मोदींना पसंती दिली आहे. तर फक्त 13 टक्के लोकांनी राहुल गांधींना साथ दिली आहे.
त्यामुळे सध्या तरी देशात मोदींची जादू दिसतेय. खरं तर गुजरात निवडणुकीनंतर काँग्रेसला अच्छे दिन येतील अशी अपेक्षा होती. मात्र काँग्रेसला फारसं यश मिळतांना दिसत नाही. सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेनुसार काँग्रेसला फक्त 60 जागा मिळू शकतील. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला 40 जागा मिळाल्या होत्या.
पंतप्रधानपदासाठी पहिली पसंती कोण?
- नरेंद्र मोदी – 63%
- राहुल गांधी – 13 %
- भाजपप्रणित एनडीए – 335
- काँग्रेसप्रणित यूपीए – 89
- अन्य – 119
- एनडीए – 335 पैकी
- भाजप – 279
- यूपीए – 89 पैकी
- काँग्रेस- 60
- एनडीए-41%
- यूपीए- 28 %
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement