एक्स्प्लोर

Asansol Bypolls : बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा होणार का बंगाली बाबू? आसनसोल लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू

Asansol Bypolls: तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने अग्निमित्रा पॉल यांनी उमेदवारी दिली आहे.

Asansol Bypolls : बिहारी बाबू आणि अभिनेते शुत्रघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) आता बंगाली बाबू होणार का याकडे साऱ्याचं लक्ष लागलं आहे. शत्रुघ्न सिन्हा पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या (TMC) तिकीटावर पोटनिवडणूक लढवत आहेत. तीन राज्यांतील विधानसभेच्या चार जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत आसनसोलमध्ये 12.77 टक्के तर बालीगंगे मतदारसंघात 8 टक्के मतदान झालं आहे. 

भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांच्या राजीनाम्यामुळे आसनसोल लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. तृणमूल काँग्रेसने यापूर्वी कधीही आसनसोलच्या जागेवर विजय मिळवता आलेला नाही. यंदा मात्र 2019 मध्ये भाजप सोडणारे अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आसनसोल मतदारसंघातील बिगर बंगाली लोकांमध्ये प्रभाव पाडून विजय मिळवतील अशी तृणमूलला आशा आहे. सिन्हा यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवार अग्निमित्रा पॉल आहेत. भाजपने अनेक स्टार प्रचारकांसह आसनसोल मतदारसंघात जोरदार प्रचार केला आहे.

मी बंगाली बाबू आहे : शत्रुघ्न सिन्हा
भाजपने ममता बॅनर्जी यांच्यावर आसनसोल मतदारसंघात बाहेरच्या व्यक्तीला आणल्याचा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं की, 'मी आता फक्त 'बिहारी बाबू' राहिलो नाहीत, तर आता 'बंगाली बाबू'ही आहेत.' प्रचाराच्या भाषणातही त्यांनी अनेकदा बंगाली भाषेचा वापर केला. 

आसनसोल मतदारसंघाचा इतिहास
आसनसोल लोकसभा 1957 ते 1967 पर्यंत काँग्रेसकडे होती. त्यानंतर 1967 ते 1971 दरम्यान आसनसोल मतदारसंघ संयुक्त समाजवादी पक्षाकडे होता. माकपने 1971 ते 1980 काळात हा मतदारसंघ काबिज केला. त्यानंतर काँग्रेसने पुन्हा सत्ता काबिज करत 1989 पर्यंत महत्त्वपूर्ण मतदारसंघ ताब्यात घेतला. 1989 ते 2014 पर्यंत ही जागा सीपीआय(एम) च्या ताब्यात होती. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत बाबुल सुप्रियो यांनी भाजपच्या तिकीटावर पहिल्यांदा ही जागा जिंकली. बाबुल सुप्रियो 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर पुन्हा विजयी झाले, त्यानंतर ते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मंत्रीही झाले.

पश्चिम बंगालमधील 2021 च्या विधानसभा निवडणुकीनंतर बाबुल सुप्रियो यांनी भाजपला रामराम केला आणि तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पोटनिवडणूक आवश्यक असल्याने आसनसोल लोकसभेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. यावेळी, तृणमूल कांग्रेसचे आमदार सुब्रोतो मुखर्जी यांच्या आकस्मिक निधनामुळे नोव्हेंबर 2021 मध्ये रिक्त झालेल्या बालीगंगे विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घ्यावी लागली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget