(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Asaduddin Owaisi : खासदार ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी 101 बोकडांची कुर्बानी
Asaduddin Owaisi News : एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी 101 बोकडांची कुर्बानी देण्यात आली.
Asaduddin Owaisi News : एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात ओवेसी बचावले होते. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली होती. ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी एका व्यावसायिकाने तब्बल 101 बोकडांची कुर्बानी दिली. सध्या या कुर्बानीची जोरदार चर्चा सुरू आहे.
तेलंगणातील हैद्राबाद येथील एका व्यावसायिकाने 101 बोकडांची कुर्बानी दिली. यावेळी एमआयएमचे आमदार अहमद बलालाही उपस्थित होते. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ओवेसी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये ते थोडक्यात बचावले होते. 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या या घटनेनंतर एमआयएमचे समर्थक सतत ओवेसींच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहेत.
हत्या करण्याच्या हेतूनेच गोळीबार
एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. ओवेसी यांच्या हत्येच्या हेतूनेच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. पोलीस चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. ओवेसी गोळीबार प्रकरणातील आरोपी सचिन शर्मा आणि शुभम हे कट्टरतावादी विचारांचे असल्याचे समोर आले आहे. ओवेसी यांच्या भाषणावर नाराज असल्याने गोळीबार करण्यात आला होता.
20 वर्षांपासून हैद्राबादमधून खासदार
जुन्या हैद्राबादमधील एका प्रतिष्ठित कुटुंबाचे सदस्य असणारे ओवेसी यांनी लंडनमधून कायद्याचे शिक्षण घेतले. मागील 20 वर्षांपासून हैद्राबादमधून लोकसभेवर निवडून जात आहे. त्याशिवाय ओवेसी यांनी आंध्र प्रदेश- तेलंगणातून बाहेर पडत पक्ष विस्तार सुरू केला आहे. महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि आता उत्तर प्रदेशमधील राजकीय हस्तक्षेप वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
असदुद्दीन ओवेसी यांच्यावरील गोळीबार प्रकरणात नवा गौप्यस्फोट; आरोपींनी दिली 'ही' माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha