एक्स्प्लोर
दहा हजार पाटीदार मुलींना 200 कोटी, गुजराती उद्योजकाचा बॉण्ड!
सूरत : गुजरातमधील एका उद्योजकाने पाटीदार समाजाच्या दहा हजार मुलींसाठी 200 कोटी रुपयांचा बॉण्ड दिला आहे. सूरतमध्ये मंगळवारी आयोजित पाटीदार समाजाच्या कार्यक्रमात लवजी डी. दैल्या उर्फ बादशाह यांनी ही घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'बेटी बचाओ बेटी पढाओ' अभियानातून हे काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचं बादशाह यांनी सांगितलं.
200 कोटी रुपयांचा बॉण्ड देणारे बिल्डर आणि उद्योजक लवजी म्हणाले की, "आमच्या समाजात स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण जास्त आहे. डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर समजलं की, अवैध गर्भपात रोखण्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी लोक उत्सुक आहेत. त्यामुळे मी कुटुंबातील दुसऱ्या मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी हा बॉण्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. या बॉण्डनुसार मुलीला तिच्या 20 व्या वाढदिवसाला 2 लाख रुपयांची रक्कम मिळेल."
2015-16 या वर्षात जन्मलेल्या आणि कुटुंबातील दुसऱ्या मुलींनाही 'बादशाह सुकन्या बॉण्ड' योजनेअंतर्गत ही रक्कम देण्यात येणार आहे.
दहा हजार मुलींना 200 कोटी या हिशेबाने प्रत्येक मुलीला दोन लाख रुपये मिळणार आहेत. पाटीदार समाजाच्या पदाधिऱ्यांच्या हस्ते या बॉण्डचं वितरण करण्यात आलं.
अशाप्रकारचा बॉण्ड वितरित करण्याचा हा दुसरा कार्यक्रम आहे. मागील वर्षी सूरत, अहमदाबाद आणि राजकोटमध्ये झालेल्या कार्यक्रमात दहा हजार मुलांना अशा प्रकारचा बॉण्ड देण्यात आला होता. यावर्षीही अहमदाबादमध्ये 8 मे आणि राजकोटमध्ये 15 मे रोजी अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement