एक्स्प्लोर
मेघालयात बस दरीत कोसळून 30 प्रवासी दगावल्याची भीती
सोनापूर : मेघालयामध्ये प्रवासी बस खोल दरीत कोसळून 30 जण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मेघालयातील पूर्वेकडील डोंगराळ परिसरात मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
बसमध्ये 35 जण प्रवास करत होते, त्यापैकी पाच जणांना बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. बचावलेल्या पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. दरी प्रचंड खोल असल्यामुळे उर्वरित 30 जण वाचण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जात आहे.
मेघालय आणि आसामच्या बराक व्हॅलीच्या सीमेपासून जवळ असलेल्या अपघातप्रवण क्षेत्रातही घटना घडली. या भागात अनेकदा दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यातच पाऊस असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याचंही सांगण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement