Bundelkhand Expressway : बुंदेलखंड एक्सप्रेसवेचं 16 जुलैला लोकार्पण; जाणून घ्या वैशिष्ट्ये
Bundelkhand Expressway : बुंदेलखंड एक्स्प्रेस वेचे उद्घाटन 16 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर, 29 फेब्रुवारी 2020 मध्ये पायाभरणी झाली.
![Bundelkhand Expressway : बुंदेलखंड एक्सप्रेसवेचं 16 जुलैला लोकार्पण; जाणून घ्या वैशिष्ट्ये Bundelkhand Expressway is set to be inaugurated by PM Narendra Modi on 16th July know details insight marathi news Bundelkhand Expressway : बुंदेलखंड एक्सप्रेसवेचं 16 जुलैला लोकार्पण; जाणून घ्या वैशिष्ट्ये](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/13/7ae220bff209f737676aa86816531ad41657716387_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bundelkhand Expressway : बुंदेलखंड एक्स्प्रेस वेचे उद्घाटन 16 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 29 फेब्रुवारी 2020 मध्ये पायाभरणी करण्यात आलेल्या या एक्स्प्रेस वेचे काम कसे पूर्ण झाले याचा तपशील शोधण्यासाठी संशोधन पथकाला सांगितले होते. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी मुख्य सचिव, डीजीपी यांनी बुंदेलखंड एक्सप्रेस वेची पाहणी केली. या एक्सप्रेस वे चे वैशिष्ट्य नेमके काय आहे? याचा फायदा कसा होणार आहे? या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 फेब्रुवारी रोजी या एक्सप्रेस वे ची पायाभरणी केली. त्यानुसार 16 जुलै 2022 रोजी एक्सप्रेस वे चे उद्घाटन होणार आहे.
- बांधकामासाठी लागणारा खर्च - 7,767 कोटी
- जमीन खरेदीसाठी खर्च - जवळपास 2,200 कोटी
- एक्सप्रेस वे ची लांबी - 296 किलोमीटर
- कुठून सुरु होणार ? - झाशी-अलाहाबाद राष्ट्रीय मार्ग क्रमांक-35 मधील चित्रकूट जिल्ह्यातील भरतकूप जवळ
- कुठपर्यंत ? - आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर इटावा जिल्ह्यातील कुद्रेल गावाजवळ
- इतक्या जिल्ह्यांतून जाईल - 7 जिल्हे (चित्रकूट, बांदा, महोबा, हमीरपूर, जालौन, औरैया, इटावा)
एक्स्प्रेस वे वर काय झाले?
रेल्वे ओव्हर ब्रिज - 4
मोठे पूल - 14
फ्लायओव्हर - 18
टोल प्लाझा - 6
रॅम्प प्लाझा - 7
छोटे पूल - 266
एक्स्प्रेस वे बांधणीचा महत्त्वाचा टप्पा :
- 36 महिन्यांत बनवायचे होते, 8 महिने आधीच तयार.
- योगी सरकारने ई-टेंडरिंगद्वारे अंदाजे खर्चाच्या 13% म्हणजे 1,132 कोटींची बचत केली.
- कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेत बहुतांश एक्सप्रेसवे बांधण्याचे काम झाले.
- यूपी देशाची एक्सप्रेस वे राजधानी बनली.
- यूपीचा सातवा एक्सप्रेस वे सुरु होणार. आतापर्यंत 6 ऑपरेशन झाले.
बुंदेलखंड एक्सप्रेस वे चा फायदा :
- बुंदेलखंड परिसर आग्रा-लखनौ एक्सप्रेसवे आणि यमुना एक्सप्रेसवेने जोडला जाईल.
- बुंदेलखंड प्रदेशाचा विकास केला जाईल.
- वाहनांच्या इंधन वापरात बचत होईल.
- प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येईल.
- द्रुतगती मार्गाने जोडलेल्या जिल्ह्याचा सामाजिक आणि आर्थिक विकास होईल.
- शेती, पर्यटन आणि उद्योगांचे उत्पन्न वाढेल.
महत्वाच्या बातम्या :
- Free Booster Dose : 18 वर्षांवरील नागरिकांना पुढील 75 दिवस बूस्टर डोस मोफत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- Ram Setu : राम सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी; 26 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी
- Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशसाठी भाजपचा खास प्लॅन, पराभूत मतदार संघाची मंत्र्यांवर मोठी जबाबदारी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)