एक्स्प्लोर

मध्यमवर्गीयांना दिलासा, सर्व बजेट एकत्र

नवी दिल्ली: ब्रिटीशांची परंपरा मोडत मोदी सरकारकडून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पहिल्यांदाच रेल्वे आणि सर्वसामान्य अर्थसंकल्प एकत्र मांडला. जेटलींनी 2017- 18 या वर्षासाठी 21 लाख 47 हजार कोटींचं बजेट सादर केलं. त्यापैकी रेल्वेसाठी 1 लाख 31 हजार कोटीची तरतूद करण्यात आली. तर सर्वाधिक 2 लाख 74 हजार कोटीची तरतूद संरक्षण क्षेत्रासाठी आहे. तीन लाखांवरील रोख व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे. तसंच राजकीय पक्षांना केवळ 2 हजार रुपयांपर्यंतचीच रोख देणगी स्वीकारता येईल. त्यावरील रक्कम चेक किंवा डिजिटल पेमेंटने स्वीकारावे लागतील.  टॅक्स स्लॅबमध्ये दिलासा जेटली यांनी मध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात काहीसा दिलासा दिला. कारण टॅक्स स्लॅबमध्ये बदल न करता, टॅक्स रेटमध्ये बदल केला. म्हणजे, आता 2.5 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी यापूर्वी असलेला 10 टक्के टॅक्स आता 5 टक्क्यांवर आणला आहे. इतकंच नाही तर 50 हजार रुपयांची सवलत (रिबेट) दिल्यामुळे आता 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्न असणाऱ्यांना काहीही टॅक्स द्यावा लागणार नाही. त्यानंतरच्या 3 ते 5 लाख या उत्पन्नावर तुम्हाला 5 टक्के कर लागेल. म्हणजे वरच्या 2 लाखांवर तुम्हाला 5 टक्के म्हणजे 10 हजार रुपये टॅक्स भरावा लागेल. (अधिक माहितीसाठी क्लिक करा) 5 लाखांवरील उत्पन्नधारकांना करात वार्षिक 12 हजार 500 रुपये सवलत असेल.  तर 50 लाख ते 1 कोटी उत्पन्नधारकांना टॅक्स असेलच शिवाय 10 टक्के अधिक सरचार्जही असेल. मध्यमवर्गीयांना दिलासा, सर्व बजेट एकत्र

रेल्वे बजेट

ब्रिटीशांची परंपरा मोडत पहिल्यांदाच सर्वसाधारण बजेटसोबतच रेल्वे बजेट सादर करण्यात आलं. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017-18 चं 1 लाख 31 हजार कोटींचं रेल्वे बजेट सादर केलं. ई-तिकीट बुक केल्यास सेवाकर लागणार नाही, अशी महत्त्वपूर्ण घोषणा अरुण जेटली यांनी केली.  रेल्वे बजेटमधील मुद्दे
  • - 3500 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग बनवला
  • - ई-तिकीट बुक केल्यास सेवाकर लागणार नाही
  • - 7 हजार रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर
  • - प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 1 लाख कोटींचा फंड
  • - ब्रॉडगेज लाईनवर मानवरहित क्रॉसिंग
  • - धार्मिक आणि पर्यटनस्थळांसाठी नव्या गाड्या सुरु करणार
  • - दिव्यांगासाठी रेल्वे स्टेशनवर लिफ्ट आणि सरकते जिने
  • - 7 हजार रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर
  • - 2019 पर्यंत सर्व रेल्वेमध्ये बायोटॉयलेट
  • - IRCTC, IRCON या रेल्वेशी निगडीत कंपन्या लवकरच शेअर बाजारात लिस्ट करणार
  • - सुरक्षा दलातल्या जवानांना त्यांची तिकीटं बुक करण्यासाठी स्वतंत्र सिस्टीम राबवणार
  • रेल्वे अर्थसंकल्पाबाबत अधिक माहितीसाठी क्लिक करा

शेती

  •  शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यासाठी 10 लाख कोटींची तरदूत
  • पीक विम्यासाठी 9 हजार कोटी कर्ज देणार
  • डेअरी विकासासाठी 8 हजार कोटी
  • 5 वर्षात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प
  • शेतीला पतपुरवठा करणाऱ्या पतसंस्था, सोसायट्या आणि जिल्हा बँकांना कोअर बँकिंगने जोडणार

उद्योगांसाठी काय?

  • 50 कोटी उलाढाल असणाऱ्या कंपन्यांना 5 टक्के करसवलत
  • स्टार्टअपच्या नफ्यावरील करसवलतीची मर्यादा 5 वरुन 7 वर्षापर्यंत वाढवली.
  • बांधकाम उद्योजकांना न विकलेल्या घरांना घरांच्या किमतीवरील करामधून सूट
  • स्टार्टअपला उभारी देण्यासाठी करकपातीचे संकेत
  • छोट्या कंपन्यांच्या कार्पोरेट करात कपात करणार

महिलासांठी काय?

  • गावागावात महिला शक्ती केंद्र उभारणार
  • अंगणवाडीत महिलांना स्वयंरोजगार शिक्षण देण्यासाठी 5000कोटींची तरतूद
  • मनरेगामधून 55 टक्के महिलांना रोजगार
  • गर्भवती महिलांच्या खात्यात 6 हजार रुपये

युवकांसाठी बजेटमध्ये काय?

  •  तरुणांना ऑनालाईन शिक्षण देण्यासाठी 'स्वयम' योजना
  • संकल्प प्रकल्पासाठी 4 हजार कोटी, संकल्पद्वारे तरुणांना रोजगार प्रशिक्षण देणार
  • 600 जिल्ह्यात युवा विकास केंद्र उभारणार
  • टेक इंडिया हा सरकारचा आगामी अजेंडा
  • IIT, मेडिकलसह सर्व उच्च शैक्षणिक प्रवेश परीक्षा एकाच संस्थेकडून व्हाव्यात यासाठी 'राष्ट्रीय परीक्षा बोर्ड' स्थापन करणार
  • नवीन मेट्रो धोरणामुळे तरुणांसाठी नोकरीच्या संधी
  • वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षणासाठी २५००० नवीन जागा

ज्येष्ठ नागरिकांसाठी काय?

  • ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्थ स्मार्ट कार्ड देणार
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी LIC पॉलिसीवर 8% टक्क रिटर्न मिळणार
  देशभरात कोण किती टॅक्स देतं?
  • देशातील 3.7 टक्के लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरलं.
  • 3.7 कोटींपैकी 99 लाख लोकांनी त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचं दाखवलं
  • 1.95 लाख लोकांनी त्यांचं उत्पन्न अडीच ते 5 लाखांपर्यंत दाखवलं
  • 52 लाख लोकांनी 5 -10 लाखांपर्यंत उत्पन्न दाखवलं
  • 24 लाख लोकांनी त्यांचं उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त दाखवलं
  • 76 लाख नोकदारांपैकी 56 लाख नोकदारांचं उत्पन्न 5 लाखांपर्यंत दाखवलं
  • 20 लाख व्यापाऱ्यांनी 5 लाख उत्पन्न दाखवलं.
  • 1.72 लाख लोकांनी त्यांचं उत्पन्न 50 लाख दाखवलं
  • मागील पाच वर्षात 1.25 कोटींपेक्षा जास्त कारची विक्री झाली.
  • 2015 मध्ये 2 कोटी लोकांनी परदेशवारी केली
  LIVE UPDATE -  अरुण जेटली लाईव्ह आता 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंत - 5 टक्के टॅक्स (यापूर्वी 10 टक्के होता) *3लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री, *3 ते 5 लाख उत्पन्न- 5 % टॅक्स *5 लाखांवरील उत्पन्नधारकांना- करात 12500 सवलत
  • राजकीय पक्षांना आता केवळ 2 हजार रुपयांची देणगीच रोख स्वीकारता येणार, त्यावरील रकमेसाठी चेक अनिवार्य
  • स्वस्त घरांसाठी आता कार्पेट एरियाच्या मर्यादेत वाढ
  • नयी दुनिया है नया है रंग काले धन को भी बदलने पडा अपना रंग, जेटलींची शायरी
  • देशातील 3.7 कोटी लोक कर भरतात
  • फक्त 20 लाख व्यापाऱ्यांनीच 5 लाख उत्पन्न दाखवलं
  • 52 लाख लोकांनी 5 ते 10 लाख उत्पन्न दाखवलं
  • 76 लाख लोक 5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न दाखवतात.
  • 99 लाख लोकांनी अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न दाखवलं
  • 3.7 कोटी लोक टॅक्स भरतात
  • 4 कोटी 2 लाख लोकांद्वारे 1.74 कोटी रिटर्न भरला जातो
  • देशातून पलायन करणाऱ्यांची संपत्ती जप्त करण्यासाठी नवा कायदा तयार करणार
  • संरक्षण खात्याचं बजेट २ लाख ७४ हजार कोटी रूपये. सर्वाधिक बजेट असलेलं मंत्रालय.
  • सैनिकांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही
  • 21 लाख 47 हजार कोटींचं बजेट, 25 टक्के भांडवली खर्च
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्थ स्मार्ट कार्ड देणार
  • आधार कार्डद्वारे आता खरेदी शक्य, डेबिड कार्डप्रमाणे वापर करता येणार
  • 2.44 लाख कोटींची कर्जाची योजना, या योजनेत एससी, एनटी वर्गाला प्राधान्य
  • भिम अॅप प्रोत्साहनासाठी कॅशबॅक आणि बक्षीस योजना
  • छोट्या शहरांमध्ये विमानतळ उभारणार
  • गावागावात महिला शक्ती केंद्र उभारणार
  • सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी 2 लाख 41 हजार 346 कोटींची तरतूद
  • पायाभूत सुविधांसाठी आजवरची सर्वाधिक म्हणजेच 3 लाख 96 हजार कोटी रुपयांची तरतूद
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी LIC पॉलिसीवर 8% टक्क रिटर्न मिळणार
  • IRCTC चे शेअर्स आता विक्रीसाठी उपलब्ध होणार
  •  2025 पर्यंत देश टीबी, गोवर, कुष्ठरोगमुक्त करणार
  • कच्च्या तेलाचं भांडार उभारणा
  • मल्टिस्टेट को ऑप. सोसायटी अॅक्टमध्ये दुरुस्ती करणार
  • माध्यमिक शिक्षणासाठी कल्पकता निधी उभारणार आणि भारतभरात एकूण १०० स्किल सेंटर्सची निर्मिती करणार
  • अंगणवाडीत महिलांना स्वयरोजगार शिक्षण देण्यासाठी 5000कोटींची तरतूद
  • 2019 पर्यंत सर्व रेल्वेमध्ये बायोटॉयलेट उभारणार
  • 25 रेल्वे स्थानकावर सरकते जिने आणि लिफ्टं बनवणार
  • रेल्वेसाठी 1 लाख 31 हजार कोटीचं बजेट, 1 लाख कोटी रुपये राष्ट्रीय रेल सुरक्षा फंड
  • 3500 किमी नवे रेल्वे रुळ, 7 हजार रेल्वे स्टेशन सौरऊर्जेवर
  • पर्यटन आणि तीर्थ क्षेत्रांसाठी विशेष ट्रेन सुरु करणार
  • इंटरनेटवरुन रेल्वे तिकीट बुक केल्यास सर्व्हिस चार्ज लागणार नाही
  • 2025 पर्यंत टीबी रोगाचा नायनाट करु
  • डॉक्टर संख्या वाढविण्यासाठी प्रवेशाच्या जागा वाढवणार
  • वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षणासाठी २५००० नवीन जागा
  • IIT, मेडिकल सह सर्व उच्च शैक्षणिक प्रवेश परीक्षा एकाच संस्थेकडून व्हाव्यात यासाठी 'राष्ट्रीय परीक्षा बोर्ड' स्थापन करणार- जेटली
  • झारखंड आणि गुजरातमध्ये दोन नव्या AIIMS स्थापन करण्याचा अर्थसंकल्पात प्रस्ताव
  • गर्भवती महिलांना 6000 रुपये
  • संकल्प प्रकल्पासाठी 4 हजार कोटी, संकल्पद्वारे तरुणांना रोजगार प्रशिक्षण देणार
  • 600 जिल्ह्यात युवा विकास केंद्र उभारणार
  • टेक इंडिया हा सरकारचा आगामी अजेंडा
  • तरुणांना ऑनालाईन शिक्षण देण्यासाठी 'स्वयम' योजना
  • स्वच्छ भारत योजनेअंतर्गत 60 टक्के गावात शौचालयं बनली
  • ग्रामीण भागात रोज 133 किमी रस्त्यांची निर्मिती होत आहे
  • 1 कोटी कुटुंब गरिबीमुक्त करणं हे सरकारचं लक्ष्य
  • तीन वर्षात 20 हजार कोटी नाबार्डला देणार
  • २०१९ पर्यंत १ कोटी कुटुंबाना घरं देणार, दारिद्र्य रेषेच्या वर आणून त्यांचं जीवनमान उंचावण्याचं लक्ष्य, ग्रामीण भागतील विजेसाठी 4500 कोटींची तरतूद
  • प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 19 हजार कोटी
  • 2019 पर्यंत 1 कोटी घरं बांधणार, त्यासाठी 23 हजार कोटी रुपये
  • 1 मे 2018 पर्यंत सर्व गावात वीज पोहोचवणार
  • मनरेगा योजनेसाठी 48 हजार कोटी
  • पीक विम्यासाठी 9 हजार कोटी कर्ज देणार
  • ग्रामविकाससाठी 3 लाख कोटी
  • 2019 पर्यंत 50 लाख ग्राम पंचायती गरिबी मुक्त करणार
  • डेअरी विकासासाठी 8 हजार कोटी
  • 5 वर्षात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प
  • टेक इंडिया हा सरकारचा आगामी काळातील अजेंडा
  • शेतीला पतपुरवठा करणाऱ्या पतसंस्था, सोसायट्या आणि जिल्हा बँकांना कोअर बँकिंगने जोडणार
  • रेल्वेचं बजेट बंद झालं असलं तरीही त्यांची स्वायत्तता कायम राहणार
  • नोटाबंदीचे वाईट परिणाम केवळ वर्षभरासाठीच
  • देशातल्या प्रत्येक नागरिकाला घर देण्याचा आमचा प्रयत्न: अरुण जेटली
  • जीएसटी आणि नोटाबंदीचा निर्णय ऐतिहासिक
  • करचुकवेगिरीमुळे देशातील जनतेचं मोठं नुकसान: अरुण जेटली
  • अतिरेकी कारवाया, बनावट नोटा, भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी नोटाबंदी गरजेची : अरुण जेटली
  • नोटाबंदीचा निर्णय जेवढा महत्त्वाचा तेवढाच धाडसी, नोटाबंदीमुळे सरकारी महसूल वसुलीला फायदा : अरुण जेटली
  • 'चांगल्या उद्दिष्टांचा कधीच पराभव होत नाही' अरुण जेटलींचा भाषणात महात्मा गांधींच्या वचनाचा नोटाबंदीबाबत उल्लेख
  • महागाई नियंत्रणात आणण्यात यश : अरुण जेटली
  • गेल्या वर्षात देशात परदेशी गुंतवणूक वाढली
  • उत्पादन क्षेत्रामध्ये भारताचा जगात सहावा क्रमांक
  • सरकार जनतेच्या पैशाचा पहारेकरी, काळ्या पैशाविरोधात मोठी लढाई
  • काळ्या पैशांविरुद्ध सध्या मोठं युद्ध सुरु आहे : अरुण जेटली
  • नोटाबंदीदरम्यान सहकार्य केल्याबद्दल देशाचे आभार
  • लोकसभेचं कामकाज आज स्थगित नाही, अर्थसंकल्पासाठी राष्ट्रपतींनी आजचा दिवस निश्चित केला आहे : सुमित्रा महाजन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gulabrao Patil : पालकमंत्रिपदाबाबत Dada Bhuse, Bharat Gogawaleवर अन्याय: गुलाबराव पाटीलABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie ReportBharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
Pandharpur Crime : चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde: मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
Embed widget