एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच, एक जवान शहीद, पाच वर्षीय मुलीचा मृत्यू
पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेजवळ वारंवार गोळीबार करत आहे. आज पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केले. या गोळीबारात एक जवान शहीद झाला असून चार जवान जखमी झाले आहेत.
श्रीनगर : पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेजवळ वारंवार गोळीबार करत आहे. आज पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केले. पाक सैन्याने पुंछमधील शाहपूर-किरनी सेक्टर, मनकोट सेक्टर आणि कृष्णा घाटी परिसरात आज (सोमवारी) बराच वेळ गोळीबार केला. या हल्ल्यात भारतीय सीमा सुरक्षा दलाचा एक इन्सपेक्टर शहीद झाला असून एका पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर चार जवान आणि 14 स्थानिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले होते. या जवानांना जवळच्या पुंछ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी उपचारादरम्यान एका जवानाचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत चार जवानांवर सध्या उपचार सुरु आहेत. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारानंतरही पाकिस्तानने गोळीबार थांबवला नाही.
Visuals from Poonch District Hospital: Total 5 security personnel got injured, of which 1 succumbed to his injuries, in ceasefire violation in Mankote & Krishna Ghati sectors of Poonch district, today. A 5-year-old girl has also died in the ceasefire violation. #JammuAndKashmir pic.twitter.com/hMC4RnmqGt
— ANI (@ANI) April 1, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement