एक्स्प्लोर
VIDEO : बिहारमध्ये महापूर, पूल कोसळल्याने तिघेजण वाहून गेले!
बिहारमधील महापूर काही कमी होण्याचं नाव घेत नाही. याच महापुरामुळे अररिया बहादुरगंज रस्त्यावरील पूल कोसळला.

पाटणा : बिहारमधील महापूर काही कमी होण्याचं नाव घेत नाही. याच महापुरामुळे अररिया बहादुरगंज रस्त्यावरील पूल कोसळला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जण वाहून गेले आहेत. त्यात एका लहान मुलाचाही समावेश आहे. 13 ऑगस्टची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नेपाळ सीमेवर असलेल्या अररिया जिल्ह्यात पुरानं थैमान घातलं आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. बिहारमधील एकूण 9 जिल्ह्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातल्यानं बऱ्याच ठिकाणी पूरपरिस्थिती पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील किशनगंज, अररिया, सुपैल, कटिहार, पूर्णिया आणि नालंदा या जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पाहा व्हिडीओ :
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
विश्व
राजकारण
महाराष्ट्र























