देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील 


उत्तर भारतात मुसळधार पाऊस, काही भागात रस्त्यांना नदीचं स्वरुप, वाहतुकीवर परिणाम  


देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. विशेषत: उत्तर भारतात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या पावासामुळं काही भागात पाणी साचलं आहे, त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर काही ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालं असून, रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. राजधानी दिल्लीत जोरदार पाऊस सुरु आहे.  (वाचा सविस्तर)


 नोकर भरती घोटाळ्याप्रकरणी टीसीएसची मोठी कारवाई! 6 कर्मचाऱ्यांना हटवलं, सहा बिझनेस असोसिएट फर्मवर बंदी


 देशातील दिग्गज आयटी कंपनी टाटा कन्सलटंसी सर्विसेज (Tata Consultancy Services) ने नोकर भरती घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. टीसीएस (TCS) कंपनीने 6 कर्मचारी आणि 6 बिझनेस असोसिएट फर्मवर बंदी घातली आहे. अलिकडेच टीसीएसमध्ये 100 कोटी रुपयांचा नोकरी घोटाळा समोर आला होता. (वाचा सविस्तर)


राज्यपालांच्या निर्णयावर मुख्यमंत्री स्टॅलिन संतापले, मंत्री सेंथिल बालाजी यांच्या बडतर्फीचा निर्णय मागे; वाचा नेमकं प्रकरण काय? 


तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी (r n ravi) यांनी मंत्री व्ही सेंथिल बालाजी (v senthil balaji) यांच्या बडतर्फीचा आदेश स्थगित केला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी गुरुवारी मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ केले होते. मात्र, तो आदेश मागे घेतला आहे. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना अटक केल्यानंतर मंत्रीमंडळातून बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (वाचा सविस्तर)


उच्च शिक्षणातील आरक्षण रद्द; अमेरिकन सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय 


अमेरिकन सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. वर्णाच्या आधारे लागू करण्यात आलेली प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. समाजातील वर्णद्वेष, सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी उच्च शिक्षणात लागू करण्यात आलेले आरक्षण ( Affirmative Action) लागू करण्यात आले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सुप्रीम कोर्टाचा निकाल दुर्देवी असल्याचे म्हटले आहे. (वाचा सविस्तर)


टायटॅनिक पाहायला गेलेल्या 5 अब्जाधीशांचे मृतदेह सापडले, ओळख पटवणंही कठीण


अटलांटिक महासागरात टायटॅनिक जहाजाचे (Titanic) अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीतील 5 अब्जाधीशांचे मृतदेह सापडले आहेत. टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन सबमर्सिबल या पाणबुडीचा स्फोट होऊन त्यामधील पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अटलांटिक महासागरात या पाणबुडीचा स्फोट झाला.  (वाचा सविस्तर)


पोलिसांची एक चूक आणि प्रेमाची राजधानी पॅरिस पेटली फ्रान्समध्ये मोठा उद्रेक 


ट्रॅफिक सिग्नलवर थांबण्यात अयशस्वी झाल्यानंतर फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या उपनगरातील नॅनटेरे येथे मंगळवारी 17 वर्षीय नहेल या मुलाला पोलिसांनी गोळ्या घातल्या. या घटनेनंतर फ्रान्समध्ये हिंसाचार सुरूच आहे. बुधवारी उशिरापासून शेकडो लोक पॅरिसच्या रस्त्यावर निदर्शने करत आहेत.  फ्रान्समध्ये गेल्या 48 तासांमध्ये जे घडलंय, ते पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येईल, की ठिणगी पडली की वणवा पेटतोच. (वाचा सविस्तर)


Horoscope Today 30 June 2023 : मेष, तूळ, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' चुका करू नयेत; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य


आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीचे लोक जे घरबसल्या ऑनलाईन काम करतील. कन्या राशीच्या उत्पन्नात वाढ होईल. आजचा शुक्रवार मेष ते मीन राशीसाठी नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. (वाचा सविस्तर)


 एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला, इतिहासात आज 


आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 30 जून रोजी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्या दिवशी 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्याला लागला होता.  (वाचा सविस्तर)