Paris Riots: पोलिसांची एक चूक आणि प्रेमाची राजधानी पॅरिस पेटली फ्रान्समध्ये मोठा उद्रेक
ट्रॅफिक सिग्नलवर थांबण्यात अयशस्वी झाल्यानंतर फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या उपनगरातील नॅनटेरे येथे मंगळवारी 17 वर्षीय नहेल या मुलाला पोलिसांनी गोळ्या घातल्या. (Photo Credit - AFP Emmanuel Dunand/AFP)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया घटनेनंतर फ्रान्समध्ये हिंसाचार सुरूच आहे. बुधवारी उशिरापासून शेकडो लोक पॅरिसच्या रस्त्यावर निदर्शने करत आहेत. (Photo Credit - AFP Emmanuel Dunand/AFP)
फ्रान्समध्ये गेल्या 48 तासांमध्ये जे घडलंय, ते पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येईल, की ठिणगी पडली की वणवा पेटतोच. (Photo Credit - AFP Emmanuel Dunand/AFP)
फ्रान्सच्या पॅरिस शहरात मोठी दहशत आहे. इथली जनता प्रचंड तणावात आहे. (Photo Credit - AFP Emmanuel Dunand/AFP)
प्रेमासाठी ओळखली जाणारी फ्रान्सची राजधानी पॅरीस गेल्या 48 तासांपासून अशांत आहे. (Photo Credit - AFP Emmanuel Dunand/AFP)
काल रात्री शहरातल्या अनेक रस्त्यांवर आगीचे लोट आहेत. पार्किंगमधल्या गाड्या जळत आहे. पोलिसांच्या तुकड्या परेड करत असून शहरात दहशत आहे. (Image Source: Getty)
पॅरिसमध्ये ट्रॅफिक चेकिंग सुरु असताना एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला, त्यानंतर आंदोलन सुरु झालं. (Image Source: Getty)
आंदोलकांनी दावा केला की पोलिसांच्या गोळीबारात त्या तरुणाचा मृत्यू झाला. (Image Source: Getty)
आंदोलनानं हिंसक वळण घेतलं. आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या पेटवल्या. त्यानंतर रस्त्यावरच्या वाहनांनी देखील आग लावली, घरांचंही नुकसान केलं, तोडफोड केली. (Image Source: Getty)
पोलिसांनी जवळपास 150 जणांना ताब्यात घेतलं. तरीही आंदोलन सुरु होतं.त्यामुळे हीच धग पुढचे काही दिवस असण्याची शक्यता आहे. (Image Source: Getty)