India Weather : देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. विशेषत: उत्तर भारतात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या पावासामुळं काही भागात पाणी साचलं आहे, त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर काही ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालं असून, रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. राजधानी दिल्लीत जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतात आजही मुसळधार पावसाचा शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांत पूर्व आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच हिमाचल प्रदेशसह दिल्ली, उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच चंदीगड, मोहाली, पंचकुला परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
25 राज्यांमध्ये दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याने देशाच्या उत्तर ते दक्षिणेकडे 25 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळम या राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
पावसामुळं रस्त्यांना नदीच स्वरुप, युवकाने रस्त्यावर चालवली बोट
दरम्यान पावसानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि नोएडाच्या काही भागात पाणी साचले आहे. या पावसामुळं दिल्लीतील 25 हून अधिक ठिकाणी पाणी साचलं आहे. काही ठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. त्यामुळं गुरुग्राममधील नरसिंगपूरसह काही भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळं काही भागातील व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका व्हायर झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण रस्त्यावर बोट चालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ फरीदाबादचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस
राज्याच्या विविध भागात पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. काही भागात चांगला पाऊस पडत आहे, तर काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे, तर कुठे अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मुंबईत गेल्या चार दिवसापासून सुरु असलेला पावसाचा जोर काही प्रमाणात कमी आला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकण विभागात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दे्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: