एक्स्प्लोर

Coronavirus | ममता बॅनर्जी यांच्या अधिकाऱ्याचा मुलगा कोरोनाबाधित; तीन दिवस अनेकांच्या भेटीगाठी

पश्चिम बंगालमध्ये एका अधिकाऱ्याच्या मुलाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. या मुलाने कोरोना चाचणीला नकार दिला होता. त्यानंतर त्याने तीन दिवस अनेकांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती आहे. यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज झाल्या असून मुलाला तपासणी न करताच सोडल्याने अधिकाऱ्यांना झापलं आहे.

कोलकाता : देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत 150 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यापैकी तिघांचा मृत्यू झालाय. देशातील 16 राज्यांमध्ये पसरलेला कोरोना आता पश्चिम बंगालमध्येही पोहचला आहे. ब्रिटनवरुन आलेल्या 18 वर्षाचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. हा गृहविभागाच्या अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचीही माहिती मिळत आहे. लंडनवरुन आल्यानंतर कोरोना चाचणीला त्याने नकार दिला होता. त्यानंतर तो अनेकांना भेटल्याचेही बोलले जात आहे. याची गंभीर दखल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली नाही. इथं कोणीही व्हीआयपी किंवा एलआयपी नाही, सर्व सारखेच आहेत. त्यामुळे सर्वांनीच नियम पाळण्याचं त्यांनी सांगितंय. ऑक्सफोर्ड विद्यापीठात शिकणारा हा विद्यार्थी यूकेहून 15 मार्चला कोलकाताला परतला. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी त्याला बेलेघाटा आयडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याला नकार देत तो घरी गेला. लंडनमधील ज्या तीन लोकांसोबत त्याने रुम शेअर केली होती. त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. यानंतरही त्याने लोकांमध्ये मिसळणं सुरुच ठेवलं. अधिकारी असलेल्या आपल्या आईला तो पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री कार्यालय असलेल्या नबन्ना येथे भेटला. तर, 16 मार्चला शहराच्या मध्यभागी असलेल्या एमआर बांगूर हॉस्पिटलला त्याने भेट दिली. तिथे त्याने अधिकाऱ्यांची भेट घेतली. पण हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्यास नकार दिला. राज्य आरोग्य विभागाने अखेर त्याला 17 मार्चला बेलेघाटा आयडी रुग्णालयात दाखल करण्यास भाग पाडले. तिथं त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याचा चालक आणि कुटुंबाला अलग ( quarantine) ठेवण्यात आलं आहे. Coronavirus | इटलीमध्ये एका दिवसात 475 जणांचा मृत्यू; जगभरातील परिस्थिती गंभीर ममता बॅनर्जी भडकल्या या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली. सोबतच मुलाला अॅडमिट न केल्याने प्रशासनालाही चांगलेच फटकारलं आहे. एवढी व्यवस्था असताना एखादी व्यक्ती तुमच्या हातून सुटणं हा बेजबाबदारपणा असल्याचे त्या म्हणल्या. नियम सर्वांना सारखेच आहेत. इथं कोणीही जास्त महत्वाचा किंवा कमी महत्वाचा नाही. सर्व सारखेच असल्याचे त्या म्हणाल्या. मी हात जोडून विनंती करते, सर्वांना घटनेचं गांभीर्य पाहून वागा, असंही ममता बॅनर्जी यांनी सांगितले. शेतकऱ्याचा पाय खोलात! आधी कोरोना अन् आता गारपीट देशात कोरोना रुग्णांची संख्या 150 वर देशात कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू वाढतच आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल केरळचा नंबर आहे. आज सकाळीच महाराष्ट्रात आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. युकेवरुन आलेली 22 वर्षीय तरुणी कोरोना पॉझिटिव्ह निघालीय. तर, उल्हासनगर येथील 49 वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाची लागण झालेली आहे. तो नुकताच दुबईहून आलेला आहे. Anti Corona Mattress Fake News | अॅंटी कोरोना गादीच्या नावाने लोकांची दिशाभूल, जाहिरातदारावर गुन्हा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget