Booster Dose Rule : कॉकटेल स्वरुपात मिळणार बुस्टर डोस? असा असू शकतो सरकारचा फॉर्म्युला
Booster Dose Rule : बुस्टर डोसबाबात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बूस्टर डोससाठी केंद्र सरकारकडून कॉकटेल लशीच्या पर्यायाची चाचपणी केली जातेय.
Booster Dose Rule : पंतप्रधान मोदींनी 10 जानेवारीपासून भारतात बुस्टर डोस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तेव्हापासूनच बुस्टर डोसबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. बुस्टर डोस किती दिला जाणार? कोणत्या लसीचा दिला जाणार? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना 10 जानेवारीपासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. पण लस देताना सरकार एक खास प्लान राबवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीला लसीचे पहिले दोन डोस एका वॅक्सिनचे देण्यात आले असतील तर तिसरा म्हणजेच, बुस्टर डोस त्याच वॅक्सिनचा देण्यात येणार नाही. तो दुसऱ्या वॅक्सिनचा देण्यात येणार आहे किंवा त्यासाठी कॉकटेल लशीच्या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे.
10 जानेवारीपासून भारतात बुस्टर डोस, अर्थात कोरोना प्रतिबंधक लशीच्या तिसऱ्या डोसचं वितरण सुरु होणार आहे. मात्र तुम्ही ज्या लशीचे दोन डोस घेतले आहेत. तीच लस बुस्टर डोस म्हणून दिली जाण्याची शक्यता कमी आहे. कारण बूस्टर डोससाठी केंद्र सरकारकडून कॉकटेल लशीच्या पर्यायाची चाचपणी केली जात आहे. कॉकटेल अर्थात दोन वेगवेगळ्या लशींचे डोस अधिक परिणामकारक असल्याचं एका अभ्यासानंतर समोर आलं आहे. या संदर्भातील अहवाल अजून प्रसिद्ध व्हायचा आहे.
एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, "जर एखाद्या व्यक्तीला त्यानं आधी घेतलेल्याच लसीचा बुस्टर डोस दिला तर तो तेवढा परिणामकारक ठरत नाही. पण कॉकटेल अर्थात दोन वेगवेगळ्या लशींचे डोस अधिक परिणामकारक असल्याचं अभ्यासात दिसून आलं आहे" अधिकाऱ्यांनी पुढे म्हटलं आहे की, जर सरकारनं डोस मिक्सिंगला परवानगी दिली, तर सीरम इन्स्टिट्यूटचे कोवोव्हॅक्स (नोव्हावॅक्सचा भारतीय ब्रँडचं नाव) हे पूर्वी कोविशील्ड मिळालेल्या लोकांसाठी बूस्टर डोससाठी वापरलं जाऊ शकतं.
बुस्टर डोसबाबत मोदींची मोठी घोषणा
आरोग्य कर्मचारी (Health Workers) अर्थात हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सना (Frontline Workers) दोन लसीकरणांनंतर बूस्टर डोसही देण्याची सुरुवात करण्यात येणार असल्याचं मोदीनी सांगितलं आहे. याची सुरुवात 10 जानेवारी, 2021 पासून होणार आहे. त्यानंतर तिसरी घोषणा म्हणजे 60 वर्षांवरील सामान्य नागरिकांनाही डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस देण्याची सुरुवात करणार असल्याचं यावेळीन मोदींनी सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :