एक्स्प्लोर
ऑलिम्पिकवीरांच्या BMW बाबत शोभा डे यांचे ट्विटरवर सवाल
मुंबई : भारतीय ऑलिम्पिकपटूंवर टीकेची झोड उठवणारे ट्वीट करणं लेखिका शोभा डे यांना चांगलंच महागात पडलं होतं. त्यावरुन उठलेला धुरळा शांत होत नाही, तोच डे यांनी पुन्हा काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
रिओ ऑलिम्पिकमधील यशस्वी खेळाडूंना बीएमडब्ल्यू भेट मिळाल्याच्या बातमीचा फोटो डे यांनी ट्वीट केला आहे. 'बीएमडब्ल्यूची खूप छान जाहिरात झाली. पण या महागड्या गाड्या पोसणार कोण? अॅथलीट्ससाठी ते पांढरे हत्ती ठरु नयेत, हीच आशा' असं त्यांनी पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
https://twitter.com/DeShobhaa/status/770125984012050432
दुसऱ्या ट्वीटमध्ये शोभा डे यांनी सचिन तेंडुलकरविषयी एक बोचरा सवाल विचारला आहे. 'माझ्या मनात एक छोटा, त्रासदायक मात्र समर्पक प्रश्न आहे. सचिनने ज्या ऑलिम्पिकवीरांना बीएमडब्ल्यू 'भेट दिली' त्यासाठी त्याच्या खिशातून पैसे गेले का?' असा प्रश्न शोभा डे यांनी विचारला आहे.
https://twitter.com/DeShobhaa/status/769902043138035712
सचिनच्या हस्ते साक्षी, सिंधू, दीपा कर्माकर आणि गोपीचंद यांना BMW भेट
रिओ ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते चौघांना बीएमडब्ल्यू कार भेट म्हणून देण्यात आल्या. माजी क्रिकेटर आणि उद्योगपती चमुंडेश्वरनाथ यांनी पीव्ही सिंधूला सचिनच्या हस्ते बीएमडब्ल्यू कार देण्याची घोषणा केली होती. मात्र नंतर इतर तिघांनाही कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. गोपीचंदच खरे हिरो असल्याचं मत यावेळी दीपा कर्माकरने व्यक्त केलं. रिओ ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधूने महिला बॅडमिंटनमध्ये भारतासाठी रौप्य पदकाची कमाई केली आहे. तर साक्षी मलिकने 58 किलो वजनी गटात फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये कांस्य पदक मिळवलं. दीपा कर्माकरला जिम्नॅस्टीकमध्ये चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. 'भारतीय पथकाचं एकच लक्ष आहे, रिओला जा, सेल्फी काढा आणि रिकाम्या हाती परत या. पैसा आणि संधी वाया घालवा' अशा आशयाचा ट्वीट शोभा डे यांनी केला होता. त्यानंतर देशभरातल्या ट्विटराईट्सकडून शोभा डे यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. अमिताभ बच्चन, अभिनव बिंद्रा, वीरेंद्र सेहवाग अशा विविध क्षेत्रातल्या सेलिब्रेटींनीही डे यांना सुनावलं.
शोभा डेंकडून रिओ ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंची थट्टा
शोभा डे या आपल्या ट्वीट्समुळे अनेकदा वादात अडकल्या आहेत. मल्टीप्लेक्समध्ये प्राईमटाईमला मराठी सिनेमा दाखवण्याबद्दल महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर शोभा डे यांनी आक्षेपार्ह ट्वीट केलं होतं. त्यानंतर शोभा डे यांनी फडणीस सरकार हुकूमशहा प्रवृत्तीचं असल्याचा आरोपही केला होता.संबंधित बातम्या :
'जे कळतं त्यावरच बोलावं', जितेंद्र आव्हाडांची शोभा डेंवर टीका
पीव्ही सिंधू फायनलमध्ये, महानायकाचा शोभा डेंना टोला
वीरुच्या ट्वीटचा धुमाकूळ, बिग बींचीही दाद
माझा कट्टा : शोभा डेंच्या त्या ट्विटबाबत आमीर म्हणतो...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement