एक्स्प्लोर
आयकरच्या कारवाईत 49 हजार 247 कोटींची काळी संपत्ती उघड

नवी दिल्ली : गेल्या चार वर्षात आयकर विभागानं केलेल्या कारवाईत तब्बल 49 हजार 247 कोटींची काळी संपत्ती उघड करण्यात आली आहे. अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत ही माहिती दिली. 2013-14 ते 2015-16 या वर्षात आयकर विभागानं एकूण दोन हजार 534 जणांवर कारवाई केली. त्यात 45 हजार 622 कोटी रुपयांच्या उत्पन्नासोबतच 3 हजार 625 कोटींची अवैध संपत्ती जप्त करण्यात आली. 2 हजार 432 प्रकरणांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर 116 जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. करचोरी रोखण्यासाठी सरकारकडून कठोर पावलं उचलण्यात येत आहेत. दरम्यान आपली अघोषित संपत्ती उघड करण्यासाठी सरकारनं 31 मार्चपर्यंत दुसरी संधी दिली आहे. त्यानंतर या संपत्तीची माहिती समोर आल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.
Before You Go
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम






















