एक्स्प्लोर

उपसभापती निवडणूक : अखेर विरोधकांचाही उमेदवार जाहीर!

अर्ज करण्याची मुदत आज दुपारी 12 वाजता संपत आहे. एनडीएचे उमेदवार हरीवंश यांच्याविरोधात यूपीएकडे काँग्रेसचे राज्यसभा खासदार बीके हरीप्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी नऊ ऑगस्टला मतदान होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत आज दुपारी 12 वाजता संपत आहे. एनडीएचे उमेदवार हरीवंश यांच्याविरोधात यूपीएकडे काँग्रेसचे राज्यसभा खासदार बीके हरीप्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण या निवडणुकीत यूपीएच्या उमेदवार मानल्या जात होत्या. मात्र विजयासाठी आवश्यक मतांची जुळवाजुळव होत नसल्याने राष्ट्रवादीने उमेदवार देण्यास नकार दिली. त्यानंतर काँग्रेसने आपल्याच पक्षातल्या उमेदवाराला संधी दिली आहे. बीजेडीचं समर्थन कुणाला? बीजेडी प्रवक्तांच्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याकडे समर्थनाची मागणी केली आहे. त्यापूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याशीही नितीश कुमार यांनी फोनवरुन बातचीत केली. या निवडणुकीत एनडीए आणि यूपीए दोन्ही पक्षांकडे आवश्यक जागा नाहीत. त्यामुळे आकड्यांची जुळवाजुळव करण्याचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे राज्यसभेत नऊ जागा असणारा बीजू जनता दल हा ओदिशाचा पक्ष किंगमेकर भूमिकेत आहे. राज्यसभेत कोणत्या पक्षाकडे किती जागा? (एकूण 245 जागा, रिक्त 1) एनडीए भाजप 73 जेडीयू 6 शिवसेना 3 अकाली दल 3 एआयएडीएमके 13 आरपीआय 1 सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट 1 तेलंगणा राष्ट्र समिती 6 नागा पिपल्स फ्रंट 1 अपक्ष 4 नामनिर्देशित 3 एकूण 115 यूपीए काँग्रेस 50 समाजवादी पक्ष 13 राष्ट्रवादी काँग्रेस 4 डीएमके 4 आरजेडी 5 इंडियन युनियन मुस्लीम लीग 1 केरळ काँग्रेस (एम) झारखंड मुक्ती मोर्चा 0 सीपीआयएम 5 बसपा 4 सीपीआय 2 तेलुगू देसम पार्टी 6 जेडीएस 1 तृणमूल काँग्रेस 13 आम आदमी पक्ष 3 नामनिर्देशित 1 एकूण 113 इतर बिजू जनता दल 9 वायएसआर काँग्रेस 2 इंडियन नॅशनल लोक दल 1 पीडीपी 2 अपक्ष 2 एकूण 16
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget