एक्स्प्लोर
गौरी लंकेश हत्या प्रकरण : रामचंद्र गुहा यांना भाजपची नोटीस
गौरी लंकेश यांच्या हत्येचा संबंध संघ परिवाराशी जोडल्यामुळे रामचंद्र गुहा यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी भाजपने नोटीस पाठवून केली आहे.
बंगळुरु : महिला पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी संबंध जोडल्याने इतिहासकार रामचंद्र गुहा यांना भाजपने कायदेशीर नोटीस बजावली आहे. गुहा यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
गौरी लंकेश यांचे मारेकरीही त्याच संघ परिवाराशी निगडीत असू शकतात, ज्यांनी नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांची हत्या केली होती, असं वक्तव्य रामचंद्र गुहा यांनी एका वेबसाईटशी बोलताना केलं होतं.
रामचंद्र गुहा यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत कर्नाटक भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस करुणाकर खासले यांनी गुहा यांना नोटीस बजावली. गुहा यांनी तीन दिवसांच्या आत माफी न मागितल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असं या नोटिशीत म्हटलं आहे.
कोण होत्या गौरी लंकेश ?
ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबरला राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यापैकी 3 गोळ्या त्यांच्या छातीत लागल्या, आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. बंगळुरुतल्या राजराजेश्वरीनगर परिसरात मंगळवार 5 सप्टेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली.
गौरी लंकेश ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या त्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या.
गौरी यांच्याविरोधात गेल्या वर्षी मानहानीच्या दोन केसही दाखल करण्यात आल्या होत्या. धारवाडमधील भाजप खासदार प्रल्हाद जोशी आणि भाजप नेते उमेश दोषी यांनी गौरी लंकेश यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा आरोप केला होता.
2008 मध्ये छापलेल्या लेखात मानहानी केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने त्यांना सहा महिन्यांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र त्यांची जामिनावर मुक्तता झाली.
2015 मध्ये ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांचीही धारवाडमध्ये राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर घडलेल्या या दुसऱ्या हत्याकांडाने राज्यात खळबळ माजली आहे.
संबंधित बातम्या :
गौरी लंकेश हत्या : हल्लेखोरांची माहिती देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस
हिंदुत्वाला विरोध केल्यानंच गौरी लंकेश यांची हत्या : राहुल गांधी
गौरी लंकेश यांची हत्या कोणी केली? चौकशीसाठी SIT ची स्थापना
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement