JP Nadda Twitter Hacked: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे ट्विटर अकाउंट हॅक
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार जे.पी. नड्डा यांचे ट्विटर अकाउंट रविवारी हॅक झाले आहे. हॅकर्सनी रविवारी सकाळी त्याचे अकाऊंट हॅक करून एक ट्विट केले.
JP Nadda Twitter Hacked : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार जे.पी. नड्डा यांचे ट्विटर अकाउंट रविवारी हॅक झाले आहे. हॅकर्सनी रविवारी सकाळी त्याचे अकाऊंट हॅक करून एक ट्विट केले. या ट्विटमध्ये 'माफ करा माझे खाते हॅक झाले. रशियाला देणगी द्यावी, त्यांना मदतीची गरज आहे', असे म्हटले आहे. हॅकर्सने नंतर प्रोफाइलचे नाव बदलून ICG OWNS INDIA केले. मात्र, आता ते ट्विट डिलीट देखील करण्यात आले आहे.
दरम्यान, आज सकाळीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मी रशियाच्या लोकांसोबत आहे. आता क्रिप्टोकरन्सीचं दान स्वीकार करा, असं ट्विट करत लिंक शेअर करण्यात आल्या होत्या. परंतू, याच ट्विटमध्ये खाली माझा युक्रेनच्या लोकांना पाठिंबा असून त्यांच्यासाठी देखील क्रिप्टोकरन्सीचं दान स्वीकार करा, असं हिंदीमध्येही लिहिलं होतं. हे दोन्ही ट्वीट हॅकर्सनी केली असल्याचे समोर आले आहे.
ट्विटर खाते हॅक कसे होते?
ट्विटरनुसार माहितीनुसार, जर तुम्ही तुमचे युजरनेम आणि पासवर्ड वापरुन जर एखाद्या थर्डपाट्री ऍप्लिकेशन किंवा वेबसाइटवर लॉग इन केले. तसेच जर तुमचा पासवर्ड हा पुरेसा स्ट्रॉंग नसेल. तसेच तुमच्या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस किंवा मालवेअर आले असतील, त्यामुळे तुमचा पासवर्ड चोरी झाला असल्यास ट्वीटर खाते हॅक होते. जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणचे इंटरनेट वापरत असाल तर तुमचे अकाऊंट हॅक होण्याचा धोका असतो.
अकाउंट हॅक झालं हे कसे ओळखावे?
तुमच्या खात्यातून डायरेक्ट मेसेज पाठवण्यात आले आहेत का?
आपले खाते हॅक केले जाऊ शकते असे नोटिफीकेशन Twitter कडून मिळाले तर
तुमच्या खात्याद्वारे अनपेक्षित ट्वीट केले गेले आहे का?
एखाद्या अनपेक्षित व्यक्तिला फॉलो करणे, अनफॉलो करणे किंवा ब्लॉक करणे इत्यादी काही घडले आहे काय़
आपले खाते हॅक केले जाऊ शकते असे नोटिफीकेशन Twitter कडून मिळाले तर
तुमच्या अकाऊंटची माहिती बदलली गेली आहे असे नोटिफीकेशन Twitter कडून मिळाले तर
तुमचा पासवर्ड काम करत नसेल आणि तुम्हाला तो रीसेट करण्यासाठी नोटीफिकेशन मिळत असेल तर
यापूर्वी म्हणजे मागील वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील ट्वीटर अकाउंट हॅक झाले होते. याद्वारे एक ट्वीट केलं गेलं होतं की, भारताने बिटकॉइनला अधिकृतरित्या कायदेशीर मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीटर हँडल काही काळासाठी हॅक झाल्याचे पीएमओने म्हटले होते. या प्रकरणाची दखल ट्वीटरकडून घेण्यात आली होती. त्यानंतर लगेच मोदींचे ट्वीटर अकाउंट सुरक्षित करण्यात आले. खाते हॅक झाल्याच्या काळात शेअर केलेले कोणतेही ट्विट दुर्लक्षित केले जावे, असे पीएमओने म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या: