एक्स्प्लोर
बलात्काराच्या घटनेवेळी मी कानपुरात होतो, कुलदीप सिंह सेंगरचा दावा
“उन्नावमधील प्रकरणावेळी मी कानपुरात वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होतो,” असा दावा भाजप आमदार आणि उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेंगरने केला आहे. सेंगरच्या दाव्यानंतर सीबीआयकडून याची सत्यता पडताळली जात आहे.
नवी दिल्ली : “उन्नावमधील प्रकरणावेळी मी कानपुरात वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होतो,” असा दावा भाजप आणि उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगरने केला आहे. सेंगरच्या दाव्यानंतर सीबीआयकडून याची सत्यता पडताळली जात आहे.
इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे. 4 जून 2017 रोजीच्या रात्री 8 वाजता आपण कानपुरात असल्याचं सेंगरने सीबीआय तपासात सांगितलं आहे. कानपुरात मी माझ्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी गेलो असल्याचा दावा सेंगरने केला आहे.
तसेच, पार्टीतले व्हिडीओ फुटेज, कॉल डिटेल्स आणि सेक्यूरिटी डिटेल्स यातूनही याबाबतची सत्यता पडताळली जाऊ शकते, असंही त्याने सांगितलं आहे. सेंगरच्या या दाव्यानंतर सीबीआकडून याची सत्यता पडताळली जात आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या वर्षी जून महिन्यात सेंगरची महिला सहकारी शशि सिंह पीडितेला नोकरी देण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे घेऊन गेली होती. यावेळी कुलदीप सेंगर आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला.
या प्रकरणी न्याय मागण्यासाठी पीडित तरुणी आणि तिचे कुटुंबीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे गेले. पण भेट मिळू न शकल्याने तिच्यासह तिच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी तिच्यासह कुटुंबियांना ताब्यात घेतलं होतं.
यावेळी पोलिसांच्या मारहाणीत पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी सेंगर विरोधात गुन्हा दाखल केला, पण त्याला अटक केली नाही.
पण विरोधक, जनतेचा रोष, मीडियाचा दबाव यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. एसआयटीच्या अहवालानंतर योगी सरकारने आमदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच या घटनेचा संपूर्ण तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.
या प्रकरणात सीबीआयने आरोपी आमदाराला अटक केली नसल्याने अलाहाबाद हायकोर्टानेही फटकारले. यानंतर शुक्रवारी आरोपी सेंगरला लखनौच्या इंदिरा नगर भागातील राहत्या घरातून नाट्यमय पद्धतीने अटक करण्यात आली.
यानंतर कुलदीप सेंगरवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या त्याची रवानगी सीबीआयच्या लखनौतील मुख्यालयात करण्यात आली आहे. तर सेंगरची सहकारी महिला शशि सिंह हिला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत शनिवारी सीबीआयने पीडित तरुणीची राममनोहर लोहिया रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली.
संबंधित बातम्या
देशाच्या मुलींना न्याय मिळेल, आरोपींना सोडणार नाही : मोदी
उन्नाव गँगरेप प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला अटक
उन्नाव प्रकरणातील गुन्हेगारांना सोडणार नाही : योगी आदित्यनाथ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement