एक्स्प्लोर

BJP Lok Sabha Candidate List : भाजपचं ठरलं! रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठापनेनंतर उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार

BJP Lok Sabha Candidate : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी होण्याची शक्यता आहे.

BJP Lok Sabha Candidate List :  लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू झाली आहे. हिंदी भाषिक राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयाने उत्साही झालेल्या भाजपने (BJP) लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विरोधकांकडून बैठकांचा जोर सुरू असताना दुसरीकडे आता भाजपकडून पुढील महिन्यातच थेट उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपकडून उमेदवारांची घोषणा सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारांची घोषणा सुरू होणार आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पहिली यादी जाहीर होऊ शकते. पुढील वर्षी 22 जानेवारीला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर भाजप लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजपने उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे उमेदवारांना प्रचाराची संधी मिळते, असे पक्षाचे मत आहे. तीन हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपला मोठा विजय मिळाल्याने याचा फायदा झाल्याचे मानले जात आहे. 

निवडणुकीसाठी टॅग लाईन तयार 

 लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) भाजपकडून (BJP) नवा नारा देण्यात आलाय. 'सपने नहीं हकीकत बुनते हैं, इसलिए तो सब मोदी को चुनते हैं' असा नवा नारा आता भाजपकडून देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने सार्वत्रिक निवडणुकीत स्वबळावर दोनदा बहुमत मिळवले आहे. 2014  मध्ये पक्षाने 'अच्छे दिन आने वाले हैं' असा नारा दिला होता. तर 2019 मध्ये  'फिर एक बार मोदी सरकार' या टॅग लाईनने प्रचार केला होता. 

भाजप नेत्यांची बैठक

दिल्लीत आजपासून भाजप पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय बैठक सुरू होत आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदीही संबोधित करणार आहेत. त्यात संघटनेचे राष्ट्रीय अधिकारी, प्रदेश प्रभारी, सहप्रभारी, प्रदेशाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला भाजपच्या सर्व आघाड्यांचे राष्ट्रीय अध्यक्षही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत अनेक मुद्द्यांचा आढावा घेतला जाणार आहे. विकास भारत संकल्प अभियान आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा हा प्रमुख मुद्दा आहे.

या बैठकीत निवडून आलेल्या प्रतिनिधींचे प्रशिक्षण, विस्तार योजना, कॉल सेंटर, पक्षाशी संबंधित असलेल्या विविध आघाड्या उपक्रम यावरही चर्चा होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तीन राज्यांतील बंपर विजयाचा उत्साह पक्षाला कायम ठेवायचा आहे. यासाठी भाजपला देशभरात राम मंदिराशी संबंधित कार्यक्रमांसह अनेक कार्यक्रम आयोजित करून कार्यकर्त्यांना मैदानात उतरवायचे आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 4 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सBJP Ministers List : भाजपची मंत्रिपदाची संभाव्य यादी समोर, ‘या’ नेत्यांना संधीEVM Expert Exclusive :  ईव्हिएमचा संशयकल्लोळ; तज्ज्ञांचा शेरा काय ?Eknath Shinde Jupiter Hospital : पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Shambhuraj Desai:'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
मोठी बातमी! विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला
विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला! 
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
Shivam Dube : 6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्याकडूनही जोरदार धुलाई, मुंबईचा धावांचा डोंगर
6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्यकुमार यादवचीही बॅट तळपली,
Embed widget