एक्स्प्लोर
अभिनेत्री आणि भाजप नेत्या रुपा गांगुली यांच्यावर हल्ला
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता हल्ल्यांचे सत्र सुरु झाले आहे. भाजप नेत्या आणि अभिनेत्री रुपा गांगुली यांच्यावर हल्ला झाला आहे. गांगुली यांच्या डोक्याला जखम झाली असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या सुखरुप असल्याची माहिती मिळते आहे.
19 मे रोजी पश्चिम बंगाल निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सत्ताधारी टीएमसी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हा दुसरा मोठा हल्ला आहे.
दक्षिण 24 परगनाहून काकदीपहून परतत असताना रुपा गांगुली यांच्यावर हल्ला झाला. निवडणुकीच्या निकालानंतर राजयकीय हिंसेत जखमी झालेल्यांना भेटण्यासाठी रुपा गांगुली गेल्या होत्या. तिथून परतत असताना हा हल्ला झाला.
रुपा गांगुली या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत हावडा (उत्तर) विधानसभा मतदार संघातून भाजपच्या उमेदवार होत्या. मात्र, टीएमसीच्या लक्ष्मी रत्न शुक्ला यांचा त्यांना निवडणुकीत सामना करावा लागला.
रुपा गांगुली यांच्यावरील हल्ल्याविरोधात भाजप पश्चिम बंगालमध्ये निदर्शनं करणार आहे. ममता बॅनर्जी यांच्या शपथविधी सोहळ्यावर भाजप बहिष्कार टाकण्याचीही शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement