एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Chhattisgarh New CM : छत्तीसगडमध्ये भाजपचा पुन्हा चकवा; निकालानंतर सातव्या दिवशी अखेर नवा मुख्यमंत्री जाहीर

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) जनता नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या घोषणेची वाट पाहत होती. त्यांची प्रतीक्षा रविवारी संपली जेव्हा विष्णू देव साय (Vishnu Deo Sai) यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली.

Chhattisgarh New CM : गेल्या आठवडाभरापासून छत्तीसगडमधील (Chhattisgarh) जनता नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या घोषणेची वाट पाहत होती. त्यांची प्रतीक्षा रविवारी संपली जेव्हा माजी केंद्रीय मंत्री विष्णू देव साय (Vishnu Deo Sai) यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत बिनविरोध मुख्यमंत्रीपदी निवड झाली. भाजप राज्यात स्वत:साठी एक मोठा आदिवासी चेहरा शोधत होता आणि त्यांचा शोध विष्णुदेव साई (59) यांच्या रूपाने पूर्ण झाला. साई यांना 30  वर्षांपेक्षा जास्त राजकीय अनुभव आहे आणि त्यांच्या साध्या स्वभावामुळे त्यांची भाजप नेत्यांमध्ये चांगलीच ख्याती आहे. संघात चांगला प्रभाव असलेले विष्णुदेव साय हे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याही जवळचे मानले जातात.

निवडणुकीचे निकाल आल्यानंतर आदिवासी आणि बिगर आदिवासी चेहऱ्यांचा समावेश असलेल्या अनेक चेहऱ्यांची चर्चा सुरू होती. माजी केंद्रीय मंत्री रेणुका सिंह, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण साओ, गोमती साई आणि माजी मंत्री लता उसेंडी यांच्याबाबत जोरदार चर्चा झाली, मात्र रविवारी विष्णुदेव साय यांचा चेहरा पक्का झाला. आदिवासींच्या चेहऱ्यावर खेळणाऱ्या भाजपने राज्य आणि केंद्राच्या राजकारणाचा भरपूर अनुभव असलेल्या विष्णुदेवांची निवड केली.

संयुक्त मध्य प्रदेश विधानसभेत आमदार (Who is Vishnu Deo Sai) 

विष्णुदेव साय यांची आमदार म्हणून ही तिसरी टर्म आहे. यावेळी त्यांनी कुंकुरीत काँग्रेसच्या उद मिंज यांचा पराभव केला. विष्णू देव यांना 87604 तर मिंज यांना 62063 मते मिळाली. साय1990 पासून राजकारणात आहे. 1990 मध्ये ते संयुक्त मध्य प्रदेशात आमदार म्हणून निवडून आले.

केंद्रातही मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली (Who is Vishnu Deo Sai) 

साय चार वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. 2014 ते 2019 दरम्यान ते केंद्रीय राज्यमंत्रीही होते. या काळात त्यांनी पोलाद, खाणकाम आणि कामगार आणि रोजगार मंत्रालयात वेगवेगळ्या वेळी राज्यमंत्री म्हणून काम केले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकीट मिळाले नाही, परंतु पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि जून 2020 मध्ये त्यांना छत्तीसगडच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केले, ज्यावर ते ऑगस्ट 2022 पर्यंत या पदावर राहिले. याआधी ते 2010 आणि 2014 मध्ये छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्षही राहिले होते. विष्णू साय यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास  त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी कौशल्या साई, मुलगा टीडी साय आणि मुली एन साय आणि स्मृती साय यांचा समावेश आहे. साय त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये एक सभ्य राजकारणी म्हणून ओळखले जातात. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरूABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Shivsena Thackeray Vs Shinde Camp: एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Embed widget