एक्स्प्लोर

Mayawati Successor : मायावतींकडून अखेर राजकीय उत्तराधिकारीची घोषणा; लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा डाव टाकला!

Mayawati Successor : अलीकडेच बसपने (Bahujan Samaj Party) आकाश आनंद यांच्याकडे चार राज्यांची जबाबदारी सोपवली होती. गेल्या 6 वर्षांत आकाश यांची पक्षातील सक्रियता वाढत आहे.

लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या (BSP) सुप्रीमो मायावती यांनी (Mayawati Successor) आज (10 डिसेंबर) लखनौमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बसपाच्या या बैठकीत मायावतींनी उत्तराधिकारी आकाश आनंद (Akash Anand Mayawati Successor)  असेल, अशी घोषणा केली आहे. या बैठकीसाठी मायावतींनी पक्षाच्या सर्व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना आणि राज्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावले आहे. आकाश आनंद हा मायावतींचा धाकटा भाऊ आनंद कुमार यांचा मुलगा आहे.

मायावती आकाश आनंद यांच्यासोबत बैठकीला पोहोचल्या होत्या. अलीकडेच बसपने (Bahujan Samaj Party) आकाश आनंद यांच्याकडे चार राज्यांची जबाबदारी सोपवली होती. गेल्या 6 वर्षांत आकाश यांची पक्षातील सक्रियता वाढत आहे. सुरूवातीला मायावतींनी आकाशची त्यांच्यासोबत व्यासपीठावर ओळख करून दिली होती. मायावतींनी आकाश आनंद यांना पक्ष समन्वयकासारखे महत्त्वाचे पद दिले होते. आकाश यांनी इतर राज्यात संघटनेच्या बैठका घेतल्या होत्या. 

कोण आहेत आकाश आनंद (Who is Akash Anand Mayawati Successor)

आकाश आनंद यांचे शालेय शिक्षण गुडगावमध्ये झाले, तर पुढील शिक्षण लंडनमध्ये केले. लंडनमधून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) केलं आहे. त्यांचा राजकारणात प्रवेश 2017 मध्ये झाला होता, जेव्हा ते सहारनपूरच्या सभेत पहिल्यांदा मायावतींसोबत स्टेजवर दिसले होते. आकाश सध्या पक्षाचा राष्ट्रीय समन्वयक आहेत. आकाश आनंदच्या राजकीय प्रवासाविषयी सांगायचं झाल्यास त्यांनी 2017 मध्ये राजकारणात प्रवेश केला. मायावतींनी 2017 मध्ये एक मोठी सभा घेऊन आकाश आनंद यांना राजकारणात आणले होते.

आकाशला उत्तराधिकारी का केले? (Akash Anand Mayawati Successor) 

मायावतींनी आपल्या भाच्याला उत्तराधिकारी म्हणून घोषित करताच आकाश आनंद यांच्या संघटनात्मक क्षमतेबाबत राजकीय वर्तुळात नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. बसपाने अनुभवी नेत्यांकडे दुर्लक्ष करून तरुण चेहऱ्यावर बाजी का मारली? याबाबत अद्याप कोणतीही राजकीय प्रतिक्रिया आलेली नाही. पण त्यामागचा हेतू स्पष्टपणे दिसतोय की, मायावतींना आकाश आनंदच्या रुपातून भविष्यातील राजकारणाकडे पाहत आहेत. जेणेकरून त्यांना निवडणुकीतील डावपेच, तिकीट वाटप, निवडणूक प्रचार आणि इतर बाबींचा अनुभव घेता येईल.

दुसरीकडे, यूपीमध्ये आकाश लॉन्च झाल्यानंतर बसपा सतत कमकुवत होत चालली आहे. 2017 आणि 2019 मध्ये पक्षाचा मोठा पराभव झाला, तर 2022 च्या यूपी निवडणुकीत बसपा फक्त एका जागेवर मर्यादित राहिला. ज्या राज्यांमध्ये पक्षाची मुळे जुनी आणि खोल असली तरी तितकी मजबूत नसलेल्या राज्यांमध्ये बसपच्या कामगिरीत मोठी घसरण झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
दिल्ली पेलेट गन हल्ला प्रकरण! राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, अखेर पोलिसांकडून FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरु 
दिल्ली पेलेट गन हल्ला प्रकरण! राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, अखेर पोलिसांकडून FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरु 
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget