एक्स्प्लोर

भाजपला आणखी एक झटका, चंद्राबाबूंचा एनडीएलाही रामराम!

आता एनडीएलाही रामराम ठोकून भाजपसोबतचे उरलेसुरले संबंध तोडण्याचा निर्णय चंद्राबाबू नायडू यांनी घेतला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारमधून बाहेर पडल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाने आता भाजपचं नेतृत्त्व असलेल्या एनडीएलाही रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. तेलगू देसम पार्टीच्या पॉलिट ब्यूरोची बैठक पार पडली. त्यानंतर चंद्राबाबूंनी नवी दिल्लीत आपल्या खासदारांशी संपर्क साधून तशा सूचना दिल्या आहेत. पक्षाकडून लवकरच याबाबतची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. मोदी सरकारविरोधात आज YSR अविश्वास प्रस्ताव आणणार आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याबाबत सरकार गंभीर नाही, असं सांगत टीडीपीच्या मंत्र्यांनी राजीनामे देत सरकारमधून बाहेर पडून मोदींना थेट आव्हान दिलं. आता एनडीएलाही रामराम ठोकून भाजपसोबतचे उरलेसुरले संबंध तोडण्याचा निर्णय चंद्राबाबू नायडू यांनी घेतला आहे. टीडीपीने पत्र लिहून आपला निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना कळवला आहे. चंद्राबाबूंचा टीडीपी एनडीएतून बाहेर सरकारविरोधातील अविश्वास ठरावाला टीडीपीचा पाठिंबा आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावर वायएसआर काँग्रेस आज (शुक्रवारी) संसदेत केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणार आहे. या अविश्वास ठरावाला समर्थन देण्याची घोषणा चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. या अविश्वास प्रस्तावाबाबत वायएसआर काँग्रेसला टीडीपीसह इतर विरोधी पक्षांचंही समर्थन मिळू शकतं. शिवसेनेच्या प्रेरणेमुळेच टीडीपी एनडीएतून बाहेर: संजय राऊत भाजपला आणखी एक झटका तीन जागांच्या लोकसभा पोटनिवडणुकीनंतर भाजपसाठी हा आणखी एक झटका समजला जात आहे. आंध्रला विशेष राज्याचा दर्जा दिला, तर बिहार, झारखंड आणि ओदिशासह इतर राज्यही अशी मागणी करु शकतात, असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं होतं. यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केंद्र सरकारमध्ये सामील आपल्या तीन मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगितलं होतं. इतकंच नाही तर याला उत्तर म्हणून आंध्र प्रदेश सरकारमध्ये सहभागी असलेल्या भाजपच्या दोन मंत्र्यांनी राजीनामे सोपवले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Ramlila Maidan Protest Charges : सरकारकडून आंदोलकांची आर्थिक कोंडी, रामलिला मैदानाच्या एका दिवसाच्या बुकिंगसाठी 'इतके' लाख रुपये खर्च, फक्त 3 दिवसच मैदान मोकळे
सरकारकडून आंदोलकांची आर्थिक कोंडी, रामलिला मैदानाच्या एका दिवसाच्या बुकिंगसाठी 'इतके' लाख रुपये खर्च, फक्त 3 दिवसच मैदान मोकळे
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी
ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
Embed widget