एक्स्प्लोर
भाजप देशात दंगली घडवेल, योगी आदित्यनाथ यांच्या मंत्र्याचा दावा
उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष देशात जातीय दंगली घडवेल, असे वादग्रस्त विधान केले आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष देशात जातीय दंगली घडवेल, असे वादग्रस्त विधान केले आहे. राजभर यांच्या या विधानामुळे योगींच्या चिंता वाढल्या आहेत. ओमप्रकाश यानी अमेरिकेने केलेल्या कथित अहवालाचा आधार घेत असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
ओमप्रकाश हे भाजपचा उत्तर प्रदेशमधील मित्र पक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज(एसबीएसपी)चे प्रमुख आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, बलिया येथील सैदपुरा गावातील एका जनसभेला संबोधित करताना राजभर यांनी हे विधान केले आहे.
ओमप्रकाश म्हणाले की, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, भाजप देशात दंगली घडवणार आहे, जर उद्या देशात दंगली घडल्या तर कोणीही हिंदू-मुस्लिमांच्या नावाने वाद घालू नये. राजकीय नेते त्यांच्या स्वार्थासाठी दंगली घडवतात. परंतु यामध्ये कोणत्याही नेत्याचा जीव जात नाही. तर यामध्ये केवळ सामान्य नागरिकांचा जीव जातो. त्यामुळे लोकांनी जात-धर्मावरुन भांडू नये, त्यामुळे दंगली होणार नाहीत.
काय आहे अमेरिकन गुप्तचर संस्थेचा अहवाल?
भारतीय जनता पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी कट्टरतेवर उतरल्यास भारतात दंगली उसळण्याची शक्यता आहे. असा दावा सर्वात मोठी अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएने केला आहे. अमेरिकी सिनेटला दिलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीपूर्वी हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर जास्त जोर लावल्यास देशात भयानक सांप्रदायिक दंगली उसळतील, असे या अहवालात म्हटले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement