एक्स्प्लोर

10th October In History : सौंदर्याची राणी रेखाचा जन्म, गझलचा बादशाहा जगजित सिंह यांचे निधन; आजचा दिवस आहे या घटनांचा साक्षीदार

On This Day In History : चीनच्या राज्यक्रांतीला आजच्या दिवशी म्हणजे 10 ऑक्टोबर 1911 रोजी सुरूवात झाली. 

मुंबई: आपल्या सौंदर्याने अवघ्या बॉलिवूडला घायाळ करणाऱ्या रेखाचा जन्मदिन (Rekha Birthday) आजचाच. रेखाच्या सौंदर्याला अभिनयाची जोड मिळाल्याने तिने भारतीय चित्रपटसृष्टीवर एक वेगळीच छाप उमटवली. आपल्या आवाजाने कोट्यवधी भारतीयांच्या मनावर राज्य करणारे गझलचे बादशाह जगजितसिंह (Jagjit Singh Death Anniversary) यांचे निधनही आजच्याच दिवशी झालं होतं. जाणून घेऊया आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं होतं. 

1845- अमेरिकेत नौदल अकादमीची स्थापना 

अमेरिकेचे नौदल हे सर्वश्रेष्ठ बनवण्यासाठी अमेरिकन सरकारकडून 10 ऑक्टोबर 1845 रोजी मेरिलँड या ठिकाणी नौदल अकादमीची (US Navy Academy) स्थापना करण्यात आली. त्यामध्ये नौदलासंबंधी वेगवेगळे प्रशिक्षण देण्यात येत होतं. 

1846- ट्रायटन उपग्रहाचा शोध 

ब्रिटनचे खगोलशास्त्रज्ञ विल्यम्स लासेल यांनी नेपच्यूनपेक्षा मोठा ग्रह असलेल्या ट्रायटन (Triton) या उपग्रहाचा शोध लावला होता. 10 ऑक्टोबर 1846 रोजी हा शोध लावला होता.

1911- चीनी क्रांतीला सुरुवात 

चीनच्या क्रांतीकारकांच्या एका गटाने 10 ऑक्टोबर 1911 रोजी वूचांग राजवटीविरोधात बंड केला. ही घटना म्हणजे चीनी क्रांतीची (China Revolution) सुरुवात असल्याचं सांगितलं जातंय. त्यानंतर चीनच्या साम्राज्याला उलथवून लावण्यात आलं. 

1911- पहिल्या भारतीय हिंदी संमेलनाची घोषणा 

पंडित मदनमोहन मालविय (Pandit Madan Mohan Malaviya) यांच्या अध्यक्षतेखाली 10 ऑक्टोबर 1911 रोजी आखिल भारतीय हिंदी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. हे संमेलन देशातील पहिलं हिंदी संमेलन होतं. 

1954- अभिनेत्री रेखाचा जन्मदिन 

भारतीय चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या रेखाचा (Rekha Birthday) जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी झाला. आपल्या सौंदर्यतेने आणि अभिनयाने रेखाने बॉलिवूडवर राज्य केलं आहे. आपल्या अदाकारीने प्रसिद्ध असलेल्या रेखाचं संपूर्ण नाव भानुरेखा गणेशन असं आहे. सावन भादो या चित्रपटातून तिन बॉलिवूडवर राज्य केलं आहे. दो अनजाने, उमराव जान, मुकद्दर का सिकंदर, खुबसूरत, सिलसिला  या चित्रपटांतील अभिनय विशेष गाजला. सिलसिला या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान रेखा आणि अमिताभच्या प्रेमप्रकरणाची चर्चा जोरात सुरू होती. 

1970- फिजी देश स्वातंत्र्य झाला

ब्रिटनच्या गुलामीत असलेल्या फिजी या देशाने 10 ऑक्टोबर 1970 रोजी गुलामगिरी झुगारून स्वत: स्वातंत्र्य झाल्याचं जाहीर केलं. 

1978- रोहिणी खाडिलकर पहिली बुद्धीबळ चॅम्पियन 

बुद्धीबळपटू रोहिणी खाडिलकर यांनी 10 ऑक्टोबर 1970 रोजी बुद्धीबळातील राष्ट्रीय चॅम्पियनशिपची स्पर्धा जिंकली. अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. 

1980- उत्तर अल्जेरियामध्ये भूकंप, 20 हजार लोकांचा मृत्यू 

10 ऑक्टोबर 1980 रोजी उत्तर अल्जेरियातील अल अस्नाम या शहरात मोठा भूकंप झाला. त्यामध्ये 20 हजाराहून जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला. 

1992- कोलकाता-हावडा दरम्यानचा विद्यासागर सेतू वाहतुकीसाठी खुला 

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आणि औद्यागिक शहर असलेल्या हावडाला जोडण्यासाठी बनवण्यात आलेला विद्यासागर सेतू हा आजच्याच दिवशी म्हणजे 10 ऑक्टोबर 1992 रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. अभियांत्रिकी कौशल्याचा अद्भूत नमुना असलेल्या हा पूर केबलपासून तयार करण्यात आलेला देशातील सर्वात मोठा पूल होता. 

2011- गझलकार जगजित सिंह यांचे निधन 

प्रसिद्ध गझलकार आणि गायक असलेल्या जगजित सिंह (Jagjit Singh Death) यांचे 10 ऑक्टोबर 2011 रोजी निधन झालं. त्यांनी आपल्या आवाजाने कोट्यवधी भारतीयांच्या मनावर राज्य केलं. खालिस उर्दूची त्यांना जाण होती. त्यांनी हिंदीसोबतच उर्दू, पंजाबी, भोजपूरी सह इतर अनेक भाषेत गायन केलं. 2003 साली त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. जगजित सिंह यांना गझलच्या दुनियेचा बादशाह असं म्हणण्यात यायचं. होठों से झुलो तुम मेरा गीत अमर कर दो, ओ मॉं तुझे सलाम, चिठ्ठी ना कोई संदेश, होश वालों को खबर क्या अशा एकाहून एक प्रसिद्ध गझलांचे गायन त्यांनी केलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget