एक्स्प्लोर

बिहारचे निकाल आश्चर्यजनक, सुरुवातीपासून निष्पक्ष नसलेल्या निवडणुकीत जिंकू शकलो नाही, लोकशाही रक्षण सुरु ठेवणार : राहुल गांधी

बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. एनडीएने मोठा विजय मिळवला आहे. महाआघाडीचा दारुण पराभव झाला आहे. यावर राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली आहे.

Rahul gandhi on Bihar Election Results 2025 :  बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल (Bihar Election Results 2025) जाहीर झाले आहेत. एनडीएने मोठा विजय मिळवला आहे. महाआघाडीचा दारुण पराभव झाला आहे. या निकालानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी एक निवेदन जारी केले आहे. महाआघाडीवर विश्वास ठेवणाऱ्या बिहारमधील लाखो मतदारांचे मी मनापासून आभार मानतो. बिहारमधील हा निकाल खरोखरच आश्चर्यजनक असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

महाआघाडीवर विश्वास ठेवणाऱ्या बिहारमधील लाखो मतदारांचे मी मनापासून आभार मानतो. बिहारमधील हा निकाल खरोखरच आश्चर्यजनक आहे. सुरुवातीपासूनच निष्पक्ष नसलेली निवडणूक जिंकण्यात आम्ही अपयशी ठरलो. ही लढाई संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे. काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी या निकालाचा सखोल आढावा घेतील. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी त्यांचे प्रयत्न अधिक प्रभावी करतील. 

आम्ही निवडणूक निकालांचा सखोल अभ्यास करु : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया दिली. आम्ही बिहारच्या जनतेच्या निर्णयाचा आदर करतो. वैधानिक संस्थांचा गैरवापर करून लोकशाहीला कमकुवत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरुद्ध आमचा लढा सुरू ठेवू. आम्ही निवडणूक निकालांचा सखोल अभ्यास करू आणि निकालांमागील कारणे समजून घेतल्यानंतर सविस्तर बोलू असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. 

निराश होण्याची गरज नाही

महाआघाडीला पाठिंबा देणाऱ्या बिहारमधील मतदारांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. मी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याला सांगू इच्छितो की निराश होण्याची गरज नाही. तुम्ही आमचा अभिमान आणि सन्मान आहात. तुमचे कठोर परिश्रम ही आमची ताकद आहे. जनजागृती करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही अरे खर्गे म्हणाले. लोकांमध्ये राहून संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आम्ही आमचा संघर्ष सुरू ठेवू. ही लढाई दीर्घकाळ चालणार आहे आणि आम्ही ती पूर्ण समर्पण, धैर्य आणि सत्याने लढू असेही ते म्हणाले.

बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा

संपूर्ण देशाचे  लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल (Bihar Election Result 2025) जाहीर झाला आहे. आतापर्यंतच्या कलानुसार बिहारमध्ये एनडीए आघाडीला भक्कम आघाडी मिळाली आहे. यानुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

बिहार विधानसभा निकालाचा धक्का बसला नाही, 'निवडणूक आयोगाचं' अभिनंदन; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

 

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget