एक्स्प्लोर

बिहार विधानसभा निकालाचा धक्का बसला नाही, 'निवडणूक आयोगाचं' अभिनंदन; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

बिहारमध्ये जे काही निकाल आले, त्याचा धक्का बसलेला नाही. मी निवडणूक आयोगाच अभिनंदन करतो, हा त्यांचा विजय आहे. भाजपने आता अमेरिकेतही निवडणूक लढवली असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

Aaditya Thackeray on BJP :  संपूर्ण देशाचे  लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल (Bihar Election Result 2025) जाहीर झाला आहे. आतापर्यंतच्या कलानुसार बिहारमध्ये एनडीए आघाडीला भक्कम आघाडी मिळाली आहे. यानुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याच मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. जे काही निकाल आले, त्याचा धक्का बसलेला नाही. मी निवडणूक आयोगाच अभिनंदन करतो, हा त्यांचा विजय आहे. भाजपने आता अमेरिकेतही निवडणूक लढवली असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

 वोट चोरी झाली होती, लवकरच आम्ही सगळे मुद्दे बाहेर काढू 

जसं तुम्ही पाहिलं तसं आम्ही पाहिलं आहे. जे काही निकाल आले त्याचा धक्का बसलेला नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले. मी निवडणूक आयोगाचं अभिनंदन करतो हा त्यांचा विजय आहे. मतदानाचा अधिकार काढून टाकल्यावर काय होत हे आज दिसल्याचे ठाकरे म्हणाले. नितिश कुमार यांची पंतप्रधान पदासाठी चर्चा सुरु होती, असेही ठाकरे म्हणाले. तेजस्वी यादव यांचा अजेंडा नोकऱ्या देणं हा होता. राहुल गांधी यांनी वोट चोरी दाखवली. वोट चोरी झाली होती. लवकरच आम्ही सगळे मुद्दे बाहेर काढू अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. फोटो मॉडेलचे सर्रास छापले आहेत. काल आणि परवा रात्री स्ट्रॉंग रुम मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. कोणी पुण्यात मतदान केलं आहे त्यांनीच बिहार मध्ये जाऊन मतदान केलं आहे असे ठाकरे म्हणाले. 

आम्ही निवडणूक आयोगावर आरोप करतो आणि देवेंद्र फडणवीस उत्तर देतात

आम्ही निवडणूक आयोगावर आरोप करतो आणि देवेंद्र फडणवीस आम्हाला उत्तर देतात, असा टोला देखील आदित्य ठाकरे यांनी लगावला. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केलेल्या टीकेवर विचारले असता, आदित्य ठाकरे म्हणाले की, चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही. सत्य परिस्थिती आहे की वोट चोरी झाली आहे. आम्ही वोट चोरी पकडली त्याचं कामं सुरु आहे. प्रारुप यादी येणार होती. ती अजूनही आलेली नाही. आमचा धसका घेऊन निवडणूक आयोग कामं करत आहे.  जे आता बिहारला गेले आहेत ते मुंबईच्या निवडणूकीची वाट बघतील असे आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपचे कार्यकर्ते आहेत जे मतदान करत आहेत जाऊन. महिलांचं मत मिळवायला त्यांचा विश्वास संपादन करण गरजेचं आहे. हा टॅक्स पेयरचा पैसा वळवला जात आहे. महिला 1500 वर मतदान करत नाहीत असेही आदित्य ठाकरे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

काँग्रेस पक्ष मुस्लिम लीग मावोवादी झालाय, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल, म्हणाले त्यांच्याकडे कोणतही व्हिजन नाही 

महत्त्वाच्या बातम्या

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget