(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bihar Election Poll of Polls | एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांचीच हवा, नितीश कुमारांसाठी धोक्याची घंटा
Bihar Election Poll of Polls बिहार विधानसभा निवडणुकीत अनेक वाहिन्यांच्या एक्झिट पोलने महागठबंधनचे सरकार सत्तेत येण्याचे संकेत दिले आहेत. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधनला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलनी व्यक्त केलाय.
पटणा: एबीपी न्यूज-सी व्होटर एक्झिट पोल तसेच देशातील इतर अनेक वाहिन्यांच्या एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार बिहारमध्ये महागठबंधनचे सरकार सत्तेत येण्याची जास्त शक्यता आहे. मंगळवारी म्हणजे 10 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. देशातील अनेक एक्झिट पोलच्या अंदाजानुसार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी तेजस्वी यादव विराजमान होण्याची शक्यता आहे.
एबीपी न्यूज-सी व्होटर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एनडीएला 104 ते 128 जागा मिळण्याची शक्यता आहे तर विरोधी पक्ष महागठबंधनला 108-131 जागा मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये चिराग पासवान याच्या लोकशक्ती जनता पक्षाला 1-3 जागा मिळतील असाही अंदाज आहे. एबीपी-सी वोटर सर्व्हेनुसार एडीएला 37.7 टक्के मते तर महागठबंधनला 36.3 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. तसेच इतर पक्षांना 26 टक्के मते मिळण्याचा संभव आहे. बिहारच्या सत्तेची कमान हाती घ्यायची असेल तर बहुमतासाठी 122 जागांची गरज आहे.
टुडेज चाणक्य-सीएनएन न्यूज 18 या पोलने तेजस्वी यादव नेतृत्व करत असलेल्या महागठबंधनला 180 जागा तर एनडीएला 55 तर अन्य पक्षांना 8 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. टुडेज चाणक्य ने महागठबंधनला 44 टक्के तर एनडीएला 34 टक्के मते मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया महागठबंधनला 139-161 जागा तर एनडीए ला 69-91जागा मिळण्याचा अंदाज या पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त लोक जनशक्ती पक्षाला 3-5 जागा आणि इतरांनाही 3-5 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या पोलनुसार आरजेडीच्या नेतृत्वाखालील महागठबंधनला 44 टक्के आणि एनडीएला 39 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
टाइम्स नाऊ-सी वोटर टाइम्स नाऊ-सी वोटरच्या पोलनुसार एनडीए ला 116 जागा तर विरोधी महागठबंधनला 120 आणि लोक जनशक्ती पक्षाला एक जागा मिळण्याची शक्यता आहे
रिपब्लिक टीव्ही-जन की बात आरजेडीच्या नेतृत्वाखालील महागठबंधनला राज्यात 128 जागांसह स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता या अंदाजात व्यक्त करण्यात आली आहे तर सत्तारुढ एनडीए ला 104 जागा तर लोक जनशक्ती पक्षाला सात जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
टीवी9 भारतवर्ष ने एनडीए ला 115 जागा तर महागठबंधन ला 120 तसेच लोकजनशक्ती पक्ष तसेच अन्य पक्षांना प्रत्येकी चार जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
तेजस्वी यादव हेच मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंत इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार बिहारच्या 44 टक्के लोकांनी तेजस्वी यादव यांनाच आगामी मुख्यमंत्र्याच्या रुपात पाहणे पसंत केले आहे. तर 35 टक्के लोकांनी नितीश कुमार यांना पुन्हा एकदा संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राजदने 18 टक्के मते घेऊन 80 जागा पटकावल्या होत्या तर जेडीयुने 11 टक्के मते घेऊन 71 जागा जिंकल्या होत्या. भाजपने 24 टक्के मते घेऊन 53 जागा जिंकल्या होत्या तर कॉंग्रेसने 27 जागा जिंकल्या होत्या आणि 7 टक्के मते घेतली होती.
महत्वाच्या बातम्या:
Bihar Election 2020 | बिहार निवडणुकीचा तिसरा टप्पा ठरवणार सरकार कोणाचे? मतदानाला सुरुवात