Bihar Election 2020 | राहुल गांधींच्या ट्वीटची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार भाजप; काय आहे प्रकरण?
Bihar Election 2020 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. अशातच आज राहुल गांधींनी केलेलं एक ट्वीट चर्चेत आलं आहे. या ट्वीटची भाजप निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही बोललं जात आहे.
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. यासंदर्भात आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लोकांना मतदानाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याचसोबत राहुल गांधी यांनी लोकांना महागठबंधनला मत देण्याचं आवाहन केलं आहे. राहुल गांधींचं हे ट्वीट आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.
भारतीय जनता पार्टी आता राहुलच्या या ट्वीट संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. भाजपचं म्हणणं आहे की, 'मतदानाच्या दिवशी अशाप्रकारे राजकीय पक्षाला मत देण्याचं आवाहन करणं आचार संहितेचं उल्लंघन आहे.'
इस बार न्याय, रोज़गार, किसान-मज़दूर के लिए आपका वोट हो सिर्फ़ महागठबंधन के लिए। बिहार के पहले चरण के मतदान की आप सभी को शुभकामनाएँ।#आज_बदलेगा_बिहार
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 28, 2020
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी म्हणजेच एकूण 71 जागांसाठी मतदान सुरु आहे. मतदान सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. दरम्यान, 4 जागांसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत, 26 जागांसाठी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आणि 5 जागांसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
राहुल गांधी यांनी बिहारच्या मतदारांना खास आवाहन केलं आहे. राहुल गांधी यांनी बिहार निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी जनतेला शुभेच्छा देत सांगितलं की, 'यावेळी न्याय, रोजगार, शेतकरी-मजूरांसाठी महागठबंधनला मत द्या.
बिहार निवडणुकांमध्ये राष्ट्रीय जनचा दल (आरजेडी), काँग्रेस आणि वाम दल सहभागी आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आरजेडीचे 42, काँग्रेसचे 21, भाकपाचे आठ उमेदवार महागठबंधनाच्या वतीने रिंगणात उतरले आहेत.
31 हजार 371 मतदान केंद्र तयार करण्यात आलीपहिल्या टप्प्यात 1066 उमेदवारांच्या भवितव्याचा आज निर्णय होणार आहे. ज्यापैकी 114 महिला आहेत. दोन कोटी 14 लाखांहून अधिक मतदार या निवडणुकीत आपलं मत नोंदवणार आहेत. बिहार निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात 31 हजार 371 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत.
एका वोटिंग सेंटरवर 1000 मतदार असतीलकोरोनाच्या संकटात पार पडणाऱ्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. निवडणुकीसाठी आयोगाकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे एका वोटिंग सेंटरवर मतदारांची संख्या 1600 वरून कमी करत 1000 करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :