India Replied To USCIRF : अमेरिकेतील यूएससीआईआरएफच्या अहवालावर भारताने व्यक्त केली नाराजी, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले...
India Replied To USCIRF : अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्र्य आयोगाच्या (USCIRF) रिपोर्टवर भारताने नाराजी व्यक्त केली आहे.
India Replied To USCIRF : अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्र्य आयोगाच्या (USCIRF) रिपोर्टवर भारताने नाराजी व्यक्त केली आहे. USCIRF ने भारतातील धार्मिक स्वातंत्र्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून भारताला चिंताग्रस्त देशांच्या यादीत टाकण्याचीही सुचवलं होतं. यावर भारताकडून कठोर शब्दान नाराजी व्यक्त करण्यात आली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबात प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
यूएससीआईआरएफच्या भारतावरील टिप्पणीबाबात प्रसारमाध्यमांनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची (Arindam Bagchi) यांना प्रश्न विचारले. त्यावर बागची म्हणाले की, यूएससीआईआरएफद्वारा भारताबाबत पक्षपाती आणि चुकीच्या टिप्पण्या दिल्या आहेत. यूएससीआईआरएफच्या या टिप्पण्यांमधून भारत आणि तिची घटनात्मक रचना, भारतातील विविधतेत एकता आणि लोकशाहीमध्ये आचारसंहितेची गंभीर कमतरता दिसून येते. यूएससीआईआरएफच्या टिपण्णींमध्ये कोणतेही तथ्य नाही. पूर्णपणे चुकीचे आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पत्रकही जारी केले आहे. यामध्ये त्यांनी यूएससीआईआरएफच्या टिप्पणीवर स्पष्टीकरण देत नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेची आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्र्य आयोग म्हणजेच यूएससीआयआरएफ मागील काही वर्षांपासून आपल्या अहवालांमधील तथ्ये वारंवार चुकीचे सादर करत आहे. अशा प्रकारच्या अशा अहवालांमुळे त्या संस्थेच्या विश्वासार्हतेबद्दल आणि निष्पक्षतेबद्दल चिंता वाढवते, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता बागची म्हणाले.
Our response to media queries on comments on India by USCIRF:https://t.co/VAuSPs5QSQ pic.twitter.com/qXnwSOA49K
— Arindam Bagchi (@MEAIndia) July 2, 2022
यूएससीआईआरएफच्या अहवालात नेमकं काय म्हटलेय?
भारतात अल्पसंख्यांकांना पक्षपातीपणाची वागणूक दिली जात असून त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन होत असल्याचे अमेरिकन समितीच्या अहवालात म्हटलेय. यूएससीआईआरएफने 2021 आणि 2022 साठी आपला अहवाल सादर केलाय. यामध्ये त्यांनी अमेरिका सरकारला भारत (India), चीन (China), पाकिस्तान (Pakistan), अफगानिस्तान (Afghanistan) आणि 11 अन्य देशांमध्ये धार्मिक स्वातंत्र्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं सांगितले. तसेच या देशांना चिंताग्रस्त देशांच्या यादीत टाकण्याची शिफारसही करण्यात आली आहे.