एक्स्प्लोर

Chandrashekhar Azad: चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर गोळीबार; सहारनपूरमध्ये झाला प्राणघातक हल्ला

Chandrashekhar Azad: काही अज्ञातांनी चंद्रशेखर आझादच्या कारवर गोळीबार केला. यात आझाद जखमी झाले आहेत.

Chandrashekhar Azad:  भीम आर्मीचे संस्थापक, अध्यक्ष चंद्रशेखर आझाद रावण (Chandrashekhar Azad Ravan) यांच्यावर गोळीबार करण्यात आला. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील देवबंद परिसरात हा प्राणघातक हल्ला झाला. आझाद जखमी झाले असून त्यांना स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  

मिळालेल्या वृत्तानुसार, काही अज्ञातांनी चंद्रशेखर आझादच्या कारवर गोळीबार केला. आझाद यांच्या कमरेजवळून एक गोळी चाटून गेली असल्याची माहिती आहे. कारचे काचाही फुटल्या आहेत. गोळीबारानंतर चंद्रशेखर आझाद यांना उपचारासाठी तातडीने नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी एसएसपी डॉ. विपिन टाडा सहारनपूर यांनी पोलीस महासंचालक विजय कुमार यांना फोनवरून घटनेची संपूर्ण माहिती दिली. 

गोळीबाराच्या या घटनेनंतर भीम आर्मीने संताप व्यक्त केला आहे. आरोपींना तातडीने अटक करावी आणि चंद्रशेखर आझाद रावण यांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी करण्यात आली आहे. आरएलडीचे स्थानिक आमदार मदन यांनी सांगितले की, सध्या रावण यांची प्रकृती स्थिर असून कोणाताही धोका नाही. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

चंद्रशेखर आझाद यांनी काय म्हटले? 

चंद्रशेखर आझाद यांनी म्हटले की, गोळीबार झाला तेव्हा माझ्यासोबत काहीजण  होती. गोळीबारानंतर स्थानिक पोलिसांकडे मदतीसाठी संपर्क साधला. हल्लेखोरांबाबत आता व्यवस्थित आठवत नाही. मात्र, माझ्या सोबत असणारे कार्यकर्ते त्यांना ओळखू शकतील. गोळीबारानंतर हल्लेखोरांची कार सहारनपूरच्या दिशेने गेली. तर, आमच्या कारने यु-टर्न घेतला. हल्ला झाला तेव्हा माझ्या लहान भावासोबत आम्ही पाचजण कारमध्ये होतो. 

पोलिसांनी काय म्हटले?

या घटनेबाबत बोलताना एसएसपी डॉ. विपिन टाडा यांनी सांगितले की, चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. हे हल्लेखोर कारमधून आले होते. हल्लेखोरांची एक गोळी आझाद यांच्या कमेरजवळून गेली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे,. हल्लेखोरांनी वापरलेल्या कारवर हरयाणा राज्याची नंबर प्लेट होती, अशी माहिती समोर आली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget