एक्स्प्लोर

Bihar Politics : LJP मध्ये उलथापालथ, पाच खासदारांनी चिराग पासवान यांची साथ सोडली

एलजेपीच्या पाच खासदारांनी पक्षातून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आता चिराग पासवान पक्षात एकटे राहिले आहेत. चिराग पासवान यांचे काका पशुपती पारस यांच्या नेतृत्त्वात हे पाचही खासदार वेगळे झाले आहेत. यात त्यांचा चुलत भाऊ प्रिन्स राज यांचाही समावेश आहे.

पाटणा : बिहारच्या राजकारणाला मोठं वळण मिळालं आहे. रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षामध्ये उलथापालथ झाली आहे. पाच खासदार चिराग पासवान यांच्यावर नाराज आहेत आणि त्यांच्याकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्रही लिहिण्यात आलं आहे. आम्हाला स्वतंत्र मान्यता मिळावी अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. हे पाचही खासदार जेडीयूमध्ये प्रवेश करु शकतात.

एलजेपीमध्ये मोठी फूट
ज्या पाच खासदारांनी चिराग पासवान यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे त्यात पासुपती पारस पासवान (काका), प्रिन्स राज (चुलत भाऊ), चंदन सिंह, वीणा देवी आणि मेहबूब अली केशर यांचा समावेश आहे. सर्व सर्व खासदार बिहार विधानसभा निवडणुकीपासून चिराग पासवान यांच्यावर नाराज होते, असं समजलं. एलजेपीमध्ये या फुटीची अटकळ आधीपासूनच बांधली जात होती पण हे खासदार मोठं पाऊस कधी उचलणार आणि चिराग पासवान यांची साथ सोडणार याची प्रतीक्षा होती. आता त्यांनी पाऊल उचललं असून एलजेपीसमोर मोठं राजकीय संकट उभं राहिलं आहे.

चिराग पासवान यांच्यासाठी राजकीय संकट
बिहार विधानसभा निवडणुकीत एलजेपीने जेव्हा भाजप-जेडीयूपासून वेगळं होऊन मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हापासूनच त्यांच्या पक्षातील नेते चिराग पासवान यांच्यावर नाराज होते. निवडणुकीच्या निकालातूनही स्पष्ट झालं की चिराग यांच्या पक्षामुळेच अनेक ठिकाणी जेडीयूच्या जागा कमी आल्या. यानंतर आता जर एलजेपीच्या पाच खासदारांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला तो चिराग पासवान यांच्यासाठी मोठा धक्का समजला जाईल.

चिराग पासवान यांच्यावरील नाराजीमुळे या पाचही खासदारांनी उघड बंडखोरी केल्याचं समजतं. सूत्रांच्या माहितीनुसार, "या पाचही खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून मागणी केली आहे की त्यांना एलजेपीपासून स्वतंत्र मान्यता मिळाली." हे खरं असेल तर पाचही खासदारांनी वेगळा मार्ग स्वीकारला असून त्यांचं प्रत्येक पाऊल चिराग पासवान यांच्यासाठी बिहारच्या राजकारणात अडचणी निर्माण करणारी ठरु शकतात.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराशी संबंध?
तसंही सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे वाहत आहे. राजकीय वर्तुळात यावरुन छुप्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. जर एलजेपीच्या या पाच खासदारांनी चिराग पासवान यांची साथ सोडली तर बिहारच्या राजकारणा मोठी उलथापालथ पाहायला मिळेल.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
Shukra Gochar : 2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
8 राष्ट्रीय पुरस्कारविजेते, चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांचं निधन; नुकतेच साजरा केला 90 वा बर्थ डे
8 राष्ट्रीय पुरस्कारविजेते, चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांचं निधन; नुकतेच साजरा केला 90 वा बर्थ डे
माहेरून पैसे आणण्याचा तगादा, नंतर पत्नीला बॉस सोबत नको ते कृत्य करणाची सक्ती; नकार देताच सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीकडून तीन तलाक
सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीकडून आधी 15 लाखांचा तगादा, मग बॉस सोबत नको ते कृत्य करणाची सक्ती, नंतर तलाक…तलाक…तलाक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 PM : 23 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal : मंत्रिपद हुकलं, केंद्रीय स्तरावर भुजबळांना कोणता जबाबदारी?Rahul Gandhi on Somnath Suryawanshi : ... म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा गंभीर आरोपTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
Shukra Gochar : 2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
8 राष्ट्रीय पुरस्कारविजेते, चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांचं निधन; नुकतेच साजरा केला 90 वा बर्थ डे
8 राष्ट्रीय पुरस्कारविजेते, चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांचं निधन; नुकतेच साजरा केला 90 वा बर्थ डे
माहेरून पैसे आणण्याचा तगादा, नंतर पत्नीला बॉस सोबत नको ते कृत्य करणाची सक्ती; नकार देताच सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीकडून तीन तलाक
सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीकडून आधी 15 लाखांचा तगादा, मग बॉस सोबत नको ते कृत्य करणाची सक्ती, नंतर तलाक…तलाक…तलाक
बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार ग्रामीण रुग्णालयाला आग; दुर्घटनेत एका रुग्णाचा मृत्यू, रुग्णालयाचेही नुकसान
बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार ग्रामीण रुग्णालयाला आग; दुर्घटनेत एका रुग्णाचा मृत्यू, रुग्णालयाचेही नुकसान
Devendra Fadnavis on Chhagan Bhujbal : भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही? देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले...
भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही? देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा परभणी दौरा, पण सरपंच देशमुखांच्या हत्येवरून आक्रोश सुरु असलेल्या बीडकडे पाठ फिरवली! सोशल मीडियात रंगली चर्चा
राहुल गांधींचा परभणी दौरा, पण सरपंच देशमुखांच्या हत्येवरून आक्रोश सुरु असलेल्या बीडकडे पाठ फिरवली! सोशल मीडियात रंगली चर्चा
Video: विनोद कांबळीला नेमकं काय झालंय? डॉक्टरांनी दिली माहिती; क्रिकेटपटूने गायलं 'हे' गाणं, सगळेच भावूक
Video: विनोद कांबळीला नेमकं काय झालंय? डॉक्टरांनी दिली माहिती; क्रिकेटपटूने गायलं 'हे' गाणं, सगळेच भावूक
Embed widget