एक्स्प्लोर
भय्यू महाराज आत्महत्या: पोलिसांना 10 पानी निनावी पत्र
भय्यू महाराज यांनी 12 जून रोजी गोळी मारुन आत्महत्या केली होती. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये तणावातून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख होता. मात्र आता पोलिसांना एक निनावी पत्र मिळालं आहे.
इंदोर: आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर आता पोलिसांना एक निनावी पत्र मिळालं आहे. या पत्रात धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. भय्यू महाराज दुसऱ्या पत्नीच्या वर्तनामुळे तणावात होते. त्या तणावातूनच त्यांनी आत्महत्या केली, असं या निनावी पत्रात म्हटलं आहे.
भय्यू महाराज यांनी 12 जून रोजी गोळी मारुन आत्महत्या केली होती. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये तणावातून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख होता. मात्र आता पोलिसांना एक निनावी पत्र मिळालं आहे.
पोलिसांनी या पत्राच्या अनुषंगाने तपास सुरु केला आहे. हे पत्र तब्बल 10 पानी असल्याची माहिती पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्र यांनी दिली. मात्र या पत्रात नेमकं काय काय नमूद आहे, याबाबतची माहिती त्यांनी दिली नाही.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निनावी पत्र पाठवणाऱ्याने आपली ओळख भय्यू महाराजांचा सेवक अशी सांगितली आहे. भय्यू महाराज यांची दुसरी पत्नी आयुषीचं भय्यू महाराजांशी वर्तन चांगलं नव्हतं. त्यामुळेच ते तणावात होते, असं या पत्रात म्हटलं आहे.
दुसरीकडे आयुषी यांची आई राणी शर्मा यांनी मात्र पत्रातील आरोप फेटाळले आहेत. निनावी पत्रातील मजकूर हा तथ्यहीन आणि मनाला येईल तसा लिहिलेला आहे, असं राणी शर्मा यांनी म्हटलंय.
भय्यू महाराज यांनी 12 जून रोजी गोळी मारुन आत्महत्या केली होती. यानंतर भय्यू महाराज यांच्या श्री सद्गुरु दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टने एक पत्र जारी करुन, माध्यमांनी चौकशीपर्यंत कुटुंबीय किंवा संस्थेच्या सदस्यांशी संपर्क न करण्याचं आवाहन केलं होतं.
ट्रस्टचे सचिव तुषार पाटील यांनी पत्र प्रसिद्ध करत, पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्याचा अहवाल सार्वजनिक होईल, त्यानंतरच आम्ही माध्यमांना आमची प्रतिक्रिया देऊ, असं म्हटलं होतं.
भय्यू महाराज यांची आत्महत्या
आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी मंगळवारी 12 जून 2018 रोजी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
भय्यू महाराजांची सुसाईड नोट
अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी इंग्रजी भाषेत एक पानी सुसाईड नोट लिहिली होती. आपल्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार न धरण्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
कुणीतरी कुटुंबाची काळजी घ्या. ताण असह्य झाला आहे. खूप खचलोय. मी सोडून जात आहे, असे भय्यू महाराज यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
कोण होते भय्यू महाराज?
भय्यू महाराज यांचं मूळ नाव उदयसिंह देशमुख आहे. मध्य प्रदेशातील शुजालपूरमध्ये भय्यू महाराजांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांचा आध्यात्माकडे कल होता. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा शौक होता.
भय्यू महाराजांनी काही काळ मुंबईत खासगी कंपनीत नोकरी केली. पण नोकरीत मन न रमल्याने त्यांनी राजीनामा दिला. सियाराम या कपड्यांच्या कंपनीसाठी मॉडेलिंगही त्यांनी केली. मात्र आध्यात्माच्या ओढीने मॉडेलिंगला सोडचिठ्ठी दिली. सदगुरु दत्त धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्टची सुरुवात केली.
भय्यू महाराज यांची दुसरी सुसाईड नोट
भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटच्या पहिल्या पानावर आपण तणावामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर 13 जून रोजी दुसऱ्या पानावरील उल्लेख समोर आला. यामध्ये त्यांनी आर्थिक कारभार सेवक विनायकने पाहावा असं म्हटलं होतं.
माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा, असा उल्लेख भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटमध्ये आहे, असं पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्रा यांनी सांगितलं होतं.
भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट सापडली. त्याच्या दुसऱ्या पानावर हा उल्लेख असल्याचं मिश्रा यांनी सांगितलं. मात्र भय्यू महाराजांचा कुटुंब-कबिला इतका मोठा असूनही, त्यांनी सुसाईड नोटमध्ये सर्व संपत्तीची जबाबदारी नोकराकडे का दिली, असा प्रश्न आहे.
संबंधित बातम्या
आर्थिक कारभार सेवकाकडे द्या, भय्यू महाराजांच्या सुसाईड नोटचं दुसरं पान
भय्यू महाराज यांची संपत्ती किती?
भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
भय्यू महाराज यांची आत्महत्या, गोळी झाडून आयुष्य संपवलं
मासिक शिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आणि भय्यू महाराजांनी गोळी झाडली!
भय्यू महाराजांची सुसाईड नोट सापडली!
हे मृत्युंजय महादेवा, मी तुला शरण आलो आहे, भय्यू महाराजांचं शेवटचं ट्विट
नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत.. सर्वांशी सख्य, भय्यू महाराज कोण होते?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement