एक्स्प्लोर

Belgaum Municipal Corporation Election : आज बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी मतदान, एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Belgaum Municipal Corporation Election : आज बेळगाव महापालिका निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीसाठी यावेळी पहिल्यांदाच ईव्हीएम मशीनचा वापर केला जाणार आहे.

Belgaum Municipal Corporation Election : दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे. आज 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून 6 सप्टेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. मराठी भाषिकांनी बेळगावचा गड राखण्याची तयारी सुरु केली आहे. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी (आज) सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानासाठी संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रे आणि आवश्यक साहित्य बेळगावातील बीके मॉडल हायस्कूल येथे वितरित करण्यात आलं आहे. 

निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया शुक्रवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पार पडणार असल्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणुकीसाठी यावेळी पहिल्यांदाच ईव्हीएम मशीनचा वापर केला जाणार आहे. निवडणुकीसाठी महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडून 1,826 निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

बेळगाव महानगरपालिका निवडणूकीत 58 प्रभागांसाठी मतदान होणार असून एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजप 55,काँग्रेस 45, महाराष्ट्र एकीकरण समिती 21, जे डी एस 11, आम आदमी 37, एआयएमआयएम 7, अन्य दोन आणि अपक्ष 217 असे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 428364 इतके मतदार असून त्यामध्ये  213536 पुरुष आणि 214834 महिला मतदार आहेत. मतदानासाठी 415 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 1828 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर चार कर्मचारी आणि एक पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि पोलीस यांच्या व्यतिरिक्त सहा राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. 300 होमगार्ड देखील बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत.

राष्ट्रीय पक्षांचीही प्रतिष्ठा पणाला 

बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष प्रथमच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. भाजप आणि काँग्रेस पक्षानं सगळ्या प्रभागात आपले उमेदवार उभे केले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीनं देखील बहुसंख्य वार्डात आपले उमेदवार उभे केले आहेत. एकाहून अधिक मराठी उमेदवार असतील, तर तिथे समन्वयानं एकच मराठी उमेदवार उभा करण्याच्या प्रयत्नाला यश मिळत आहे. भाजपमध्ये तिकीट देताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे भाजपला नाराजीचा फटका बसणार आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यामुळं अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असणाऱ्या सात कार्यकर्त्यांची भाजप मधून निवडणुकीच्या तोंडावर हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे कर्नाटक प्रदेश अध्यक्ष नालिनकुमार कटील, मंत्री इश्र्वराप्पा,मंत्री गोविंद करजोळ यांनी देखील बेळगावात प्रचारात भाग घेतला. काँग्रेस पक्षाचे देखील राज्य पातळीवरील नेते प्रचारात सहभागी होत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते घरोघरी जावून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. एमआयएम पक्षानं देखील महानगरपालिका निवडणुकीत आपलं नशीब आजमावून पाहायचं ठरवलं असून सहा प्रभागात त्यांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. अकबरुद्दीन ओवेसी यांनी देखील बेळगावला भेट देऊन आपल्या उमेदवारांचा प्रचार केला आहे.

महानगरपालिकेच्या समोर लावण्यात आलेला बेकायदेशीर लाल पिवळा झेंडा, शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास करण्यात आलेला विरोध,कन्नड मधून कागदपत्रे देणे, मराठी भाषिकांची गळचेपी करणे, कन्नड फलक लावण्याची सक्ती करणे आदी मुद्दे महाराष्ट्र एकीकरण समितिच्या उमेदवारांनी प्रचारात अधोरेखित केले आहेत. राष्ट्रीय पक्षाने विकासाचे गाजर आपल्या जाहीरनाम्यातून मतदारांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी अस्मितेचा,संस्कृतीचा महाराष्ट्र एकीकरण समितिचा मुद्दा, राष्ट्रीय पक्षाकडून दाखवली जाणारी प्रलोभने या बरोबरच अन्य अनेक विषय यावेळच्या महानगरपालिका निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत.

दरम्यान, राज्यातील प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडून मतदानासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
Embed widget