एक्स्प्लोर

सुषमा स्वराज यांचे पार्थिव अनंतात विलीन, मुलगी बांसुरी यांनी अंत्यविधी पार पाडले

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर आज दिल्लीतल्या लोधी रोड येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यंसस्कार करण्यात आले.

नवी दिल्ली : माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर आज दिल्लीतल्या लोधी रोड येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यंसस्कार करण्यात आले. यांच्या पार्थिवावर विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज यांनी अंत्यविधी पार पाडले. यावेळी स्वराज यांचे पती स्वराज कौशल, त्यांचे नातेवाईक, देशभरातील नेते मंडळी आणि त्यांच्या चाहत्यांनी साश्रुनयनांनी त्यांना अखेरचा सलाम केला. अंत्यविधीपूर्वी काही वेळ दिल्लीतील भाजप मुख्यालयात सुषमा स्वराज यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. सुषमा स्वराज यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते, महामार्ग आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासह केंद्रातल्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. काल (मंगळवारी)रात्री 9 च्या सुमारास सुषमा स्वराज यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या होत्या. त्यानंतर रात्री 9.30 च्या सुमारास त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 67 वर्षांच्या होत्या. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात स्वराज यांनी परराष्ट्रमंत्रीपद भूषवले होते. प्रकृती खालावल्यामुळे स्वराज यांनी यावर्षीची लोकसभा निवडणूक न लढण्याचे ठरवले होते. सुषमा स्वराज या 1990 साली पहिल्यांदा खासदार झाल्या. अटल बिहारी वाजपेयी यांच्या 13 दिवसांच्या सरकारमध्ये त्या माहिती प्रसारण मंत्री होत्या. 1998 साली त्यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. 2009 ते 2014 या काळात त्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये बड्या चांदी व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, 25 किलो चांदी गायब,  पोलिसांकडून एकाला अटक
कोल्हापूरमध्ये बड्या चांदी व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, 25 किलो चांदी गायब, पोलिसांकडून एकाला अटक
Shani 2024 : ऐन नवरात्रीत शनि नक्षत्र बदलणार; 'या' 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार प्रचंड वाढ
ऐन नवरात्रीत शनि नक्षत्र बदलणार; 'या' 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार प्रचंड वाढ
विखुरलेलं सामान, सगळीकडे रक्ताचे डाग अन् फ्रिजमध्ये कुजलेला मृतदेह; घराचा दरवाजा उघडताच आई हादरली, नेमकं घडलं काय?
विखुरलेलं सामान, सगळीकडे रक्ताचे डाग अन् फ्रिजमध्ये कुजलेला मृतदेह; घराचा दरवाजा उघडताच...
Astrology : आज सिद्धी योगासह बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशी ठरणार लकी, अचानक धनलाभाचे संकेत
आज सिद्धी योगासह बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशी ठरणार लकी, अचानक धनलाभाचे संकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 23 September 2024 23 September 2024Dombivali Car Accident : क्षुल्लक कारणावरुन थेट कार अंगावर घातली, डोंबिवलीतील धक्कादायक प्रकारPune Posco Case : 2021 ची घटना, आरोप सिद्ध, पॉक्सो खटल्यासाठी एकच न्यायाधीश असल्याने निकाल प्रलंबितसकाळी ७ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 23 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये बड्या चांदी व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, 25 किलो चांदी गायब,  पोलिसांकडून एकाला अटक
कोल्हापूरमध्ये बड्या चांदी व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, 25 किलो चांदी गायब, पोलिसांकडून एकाला अटक
Shani 2024 : ऐन नवरात्रीत शनि नक्षत्र बदलणार; 'या' 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार प्रचंड वाढ
ऐन नवरात्रीत शनि नक्षत्र बदलणार; 'या' 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार प्रचंड वाढ
विखुरलेलं सामान, सगळीकडे रक्ताचे डाग अन् फ्रिजमध्ये कुजलेला मृतदेह; घराचा दरवाजा उघडताच आई हादरली, नेमकं घडलं काय?
विखुरलेलं सामान, सगळीकडे रक्ताचे डाग अन् फ्रिजमध्ये कुजलेला मृतदेह; घराचा दरवाजा उघडताच...
Astrology : आज सिद्धी योगासह बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशी ठरणार लकी, अचानक धनलाभाचे संकेत
आज सिद्धी योगासह बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशी ठरणार लकी, अचानक धनलाभाचे संकेत
Thane Crime : शी, हा काय प्रकार? प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लघवी करून फळं विकायचा; VIDEO Viral झाल्यानंतर ठोकल्या बेड्या
शी, हा काय प्रकार? प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लघवी करून डोंबिवलीकरांना विकायचा फळं
Ajit Pawar exit From Mahayuti: कट्टर हिंदुत्त्व मान्य नसेल तर महायुतीमधून बाहेर पडा; अजित पवारांच्या एक्झिटसाठी  भाजप-शिंदे गटाचा चक्रव्यूह?
अजित पवारांचा महायुतीत पद्धतशीर 'कार्यक्रम', एक्झिटसाठी भाजप-शिंदे गटाने रचलं चक्रव्यूह?
Horoscope Today 23 September 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Jobs News : महाराष्ट्रातील तरुण जर्मनीनंतर रोजगारासाठी इस्त्रायलला जाणार, बांधकाम क्षेत्रात मोठी संधी, प्रशिक्षणही मिळणार 
कुशल बांधकाम कामगारांना इस्त्रायलमध्ये नोकरीची संधी, महाराष्ट्र सरकार प्रशिक्षण देणार, जाणून घ्या नेमकी योजना
Embed widget