एक्स्प्लोर
बँका तीन दिवस बंद, ऑनलाईन व्यवहार करण्याचं आवाहन
गुरुनानक जयंतीनिमित्त आज (शुक्रवार 23 नोव्हेंबर) बँकांना सुट्टी आहे. तर चौथ्या शनिवारमुळे उद्या (24 नोव्हेंबर) आणि रविवार (25 नोव्हेंबर) असे सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत.

मुंबई : देशभरातील बँका पुढचे सलग तीन दिवस बंद राहणार असून ग्राहकांनी ऑनलाईन व्यवहार करावेत, असं आवाहन बँकांच्या वतीने करण्यात आलं आहे. या काळात एटीएममध्ये पैशांचा खडखडाट झाल्यास ग्राहकांची गैरसोय होऊ शकते. गुरुनानक जयंतीनिमित्त आज (शुक्रवार 23 नोव्हेंबर) बँकांना सुट्टी आहे. तर चौथ्या शनिवारमुळे उद्या (24 नोव्हेंबर) आणि रविवार (25 नोव्हेंबर) असे सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे एटीएममध्ये पैशांचा खडखडाट होऊ शकतो. नागरिकांनी शक्यतो ऑनलाईन व्यवहार करावेत, असं आवाहन बँकांच्या वतीने करण्यात आलं आहे. तीन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी (26 नोव्हेंबर) बँकांचे कामकाज सुरु होईल. मात्र ओव्हरलोडमुळे त्या दिवशीचे चेक क्लिअरिंगच्या कामास आणखी एखादा दिवस लागू शकतो, असंही बँकांनी स्पष्ट केलं.
आणखी वाचा























