एक्स्प्लोर
बँकेत सुट्ट्या पैशांची वानवा, 20 हजार रुपयांची दहाची नाणी

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर सुट्ट्या पैशांची जमवाजमव करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची धावपळ सुरु आहे. वीस हजार रुपये खात्यातून काढण्यासाठी गेलेल्या एका ग्राहकाला बँकेने चक्क दहा-दहा रुपयांची नाणी सोपवली आहेत. नवी दिल्लीत राहणारे इम्तियाज आलम हे जसोलामधल्या जामिया को-ऑपरेटिव्ह बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेत पैशांची कमतरता होती, मात्र पैशांची नितांत आवश्यकता असल्याचं त्यांनी बँक मॅनेजरला सांगितलं. अखेर दहा-दहा रुपयांच्या नाण्यांच्या स्वरुपात ही रक्कम स्वीकारण्याबाबत त्यांना बँकेतर्फे विचारणा करण्यात आली. विशेष म्हणजे नाण्यांच्या स्वरुपात 20 हजार स्वीकारण्यासाठी त्यांना रांगेत उभं राहण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे इम्तियाज यांनी ही रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. वीस हजार रुपयांची रक्कम इम्तियाज आलम यांना दहा रुपयांच्या दोन हजार नाण्यांच्या स्वरुपात देण्यात आली. या नाण्यांचं एकूण वजन 15 किलो असल्याची माहिती आहे. https://twitter.com/ANI_news/status/799867253084680192
आणखी वाचा























