(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Balochistan: बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी भारताने मदत करावी, निर्वासित पंतप्रधान नेला कादरी यांची गंगा पूजा करत स्वातंत्र्याची प्रार्थना
Balochistan PM-in-exile Naela Quadri : पाकिस्तानने हा देश बळकावला असून त्याला चीनची मदत होते असा आरोप नेला कादरी यांनी केला.
हरिद्वार: बलुचिस्तानच्या (Balochistan) स्वातंत्र्यलढ्यासाठी जो प्रयत्न सुरू आहे त्याला भारताने मदत करावी अशी मागणी बलुचिस्तानच्या निर्वासित पंतप्रधान नेला कादरी (Balochistan PM-in-exile Naela Quadri) यांनी केली आहे. पाकिस्तानने बलुचिस्तानचा प्रदेश जबरदस्तीने बळकावला असून त्याच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही संयुक्त राष्ट्रात आवाज उठवला असून त्याला नरेंद्र मोदींनी पाठिंबा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बलुचिस्तानच्या बंडखोर नेत्या नेला कादरी यांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथील व्हीआयपी घाटावर गंगा आरती केली आणि बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्याला यश मिळवी अशी प्रार्थना केली. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्याला मदत करण्याची भारताला आज संधी आहे, ती उद्या कदाचित मिळण्याची शक्यता नाही, त्यामुळे भारताने पूर्ण ताकतीने बलुचिस्तानच्या मागे उभे रहावे अशी मागणीही त्यांनी केली.
नेला कादरी यांनी त्यांच्या समर्थकांसह बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा लढा सुरू केला असून त्यांनी स्वतःला पंतप्रधान घोषित केलं आहे. सध्या त्या कॅनडामध्ये आश्रयाला आहेत.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यावर नेला कादरी म्हणाल्या की, बलुचिस्तान एकेकाळी स्वातंत्र्य देश होता. पण पाकिस्तानने (Pakistan) हा देश जबरदस्तीने बळकावला. या ठिकाणच्या समृद्ध खनिज संपत्तीची लूट चालवली आहे. इथल्या लोकांवर अनन्वित अत्याचार केला जातोय. बलुच लोकांची घरं जाळली जात आहेत, इथल्या मुलींवर बलात्कार केले जात आहेत. जगातली कुठला ही व्यक्ती विचारही करू शकणार नाही इतके अत्याचार बलुचिस्तानवर केले जात आहेत.
बलुचिस्तानवर अत्याचार करण्यामध्ये, तिथल्या लोकांचे स्वातंत्र्य हिरावण्यामागे पाकिस्तान एकटा नसल्याचा आरोप नेला कादरी यांनी केला. त्या म्हणाल्या की, पाकिस्तानला या कामात चीनचा पाठिंबा आणि मदत मिळते. बलुचिस्तान आणि भारतीय लोकांचे संबंध हे प्राचीन काळापासून आहेत. भारताने आता बलुचिस्तानच्या मागे उभे रहावे, आम्ही स्वातंत्र्य झाल्यावर भारताच्या मागे ठामपण उभे राहू.
केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यावर आवाज उठवला होता. पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच भारताच्या भूमिकेचे बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधीर गिलगिट बाल्टिस्तानमधील नागरिकांनी आभार मानल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या या भूमिकेनंतर बलुचिस्तामधून त्याचं स्वागत करण्यात आलं होतं. बलुचिस्तानमधील जनता पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मागत असून हा लढा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे संयुक्त राष्ट्रांमध्ये पोहोचला आहे.
ही बातमी वाचा: