(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Balochistan Hinglaj Mata Temple: पाकमधील वैष्णो देवी मातेच्या उत्सवाला दोन वर्षानंतर सुरुवात, भारतीय भाविक मोठ्या संख्येने सहभागी
Balochistan Hinglaj Mata Temple: पाकिस्तानातील हंगुल नदीच्या किनाऱ्याजवळ असलेल्या गुहेत हिंगलाज मातेच्या मंदिराला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.
Pakistan: कोरोनामुळे दोन वर्ष खंड पडलेल्या पाकिस्तानातील (Pakistan) बलुचिस्तानमधील हिंगलाज माता यात्रेला मोठ्या उत्साहत सुरुवात झाली. हा पाकिस्तानातील सर्वात जुना उत्सव असून या उत्सवासाठी फक्त भारतातील नाही तर जगभरातील भाविक पाकिस्तानात जातात. बलुचिस्तानच्या लासबेला जिल्ह्यातील कुंड मलिर भागात हे प्राचीन मंदिर आहे. हिंदू भाविकांसाठी हे पवित्र मानले जाते. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. पाकमधील हे शक्तीपीठ वैष्णो देवी नावाने प्रसिद्ध आहे. पाकिस्तानातील हिंदू बांधवांचे हे एक आस्थेचे केंद्र आहे. केवळ हिंदू नाही, तर मुस्लिम बांधवही या मंदिरात सेवा करण्यासाठी येतात
पाकिस्तानातील हंगुल नदीच्या किनाऱ्याजवळ असलेल्या गुहेत हिंगलाज मातेच्या मंदिराला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हा उत्सव वर्षानुवर्षे येथे पार पडत आहे. दरवर्षी भाविक नारळ फोडून पूजा करतात. हे जगातील पाच प्राचीन हिंदू मंदिरांपैकी एक आहे. माता उत्सवाबाबत बलुचिस्तानचे सिनेटर दानेश कुमार म्हणाले की, कोविड महामारीमुळे येथे दोन वर्षे हिंगलाज माता उत्सव पार पडला नाही. मात्र यंदा दोन वर्षाच्या ब्रेकनंतर उत्सवासाठी हिंदू भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. तीन दिवसीय धार्मिक उत्सवासाठी हजारो हिंदू भाविक भारतासह विविध देशातून येथे येतात पूर्वी भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचणे खूप कठीण होते, परंतु आता रस्ते चांगले झाले आहेत.
तीन दिवस उत्सव
दानेश कुमार पुढे म्हणाले की, तीन दिवसांचा हा उत्सव असतो. अनेक भाविक मंदिरात जाण्यासाठी अनवाणी जाणे पसंत करतात. मंदिरात पोहोचताना त्यांना जितक्या वेदना सहन कराव्या लागतील तितकाच त्यांच्यावर मातेचा आशीर्वाद असेल, अशी त्यांची श्रद्धा आहे. बलुचिस्तानचे अल्पसंख्याक मंत्री खलील जॉर्ज यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, सरकारने हिंगलाजमधील सर्व मूलभूत सुविधांवर 300 दशलक्ष रुपये खर्च केले आहेत. यात्रेसाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रा परिसरात 1000 पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
कोस्टल रोडमुळे यात्रा झाली सोपी
कार्यक्रमाचे आयोजक महाराज गोपाळ म्हणाले की, कोस्टल हायवे तयार झाल्याने यंदा भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. पूर्वी येथे रस्ते नसल्यने वाहने घेऊन लोकांना येणे शक्य नव्हते. त्यामुळेच ते जंगलातील रस्त्याने पायी येत असे. किंवा काही भाविक घोड्यवर किंवा उंटावर येत असेय हायवे आणि कोस्टल रोड तयार झाल्यानंतर इथपर्यंत पोहोचणे भाविकांना सोपे झाले आहे. आता भाविक कार आणि बसने सहज माातेच्या दर्शनाला येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :