एक्स्प्लोर

कोर्टातून हेलिकॉप्टरने थेट तुरुंगात, राम रहीम कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. बाबा राम रहीमला 28 ऑगस्टला शिक्षा सुनावली जाणार आहे. बाबाला 7 ते 10 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे

चंदीगड : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या बलात्कार प्रकरणात पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी आज हा निकाल दिला. बाबा राम रहीमला 28 ऑगस्टला शिक्षा सुनावली जाणार आहे. बाबाला 7 ते 10 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे राम रहीमवरील आरोप सिद्ध झाल्यानंतर भक्तांनी हरियाणामध्ये हैदोस घातला. अनेक वाहनांची जाळपोळ केली, सरकारी कार्यालयांना आग लावली, तर पोलिसांवरही दगडफेक केली. भक्तांची गुंडगिरी रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे हरियाणा सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. या हिंसाचारात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जखमी आहेत. कोर्टाबाहेरील जमाव पाहता प्रशासनाने राम रहीमला कोर्टातून थेट रोहतक जेलमध्ये हेलिकॉप्टरने नेलं. 800 गाड्यांच्या ताफ्यांसह कोर्टात पंचकुलामध्ये अनुयायींनी गर्दी केल्याने बाबा राम रहीमला सीबीआय कोर्टापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत होत्या. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम सुमारे 800 गाड्यांच्या ताफ्यासह पंचकुला कोर्टात पोहोचला. राम रहीम मागच्या दरवाजाने कोर्टरुममध्ये दाखल झाला. रेल्वे रद्द, इंटरनेट बंद पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानकडे जाणाऱ्या सुमारे 72 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. तर याशिवाय मोबाईल आणि इंटरनेट सेवाही 72 तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? एप्रिल 2002 : 2002 मध्ये साध्वींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप बाबा गुरमीत राम रहीमवर आहेत. साध्वीने एप्रिल 2002 मध्ये तत्कालिन मीडिया, पंजाब-हरियाणा हायकोर्टाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र लिहून राम रहीमवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर हायकोर्टाने 24 सप्टेंबर 2002 रोजी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. मे 2002 : तक्रारीच्या पत्राची पडताळणी केल्यानंतर तपासाची जबाबदारी सिरसा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांवर सोपवली होती. डिसेंबर 2002 : तक्रार योग्य असल्याचं सिद्ध झाल्यानंतर राम रहीमविरोधात कलम 376, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. डिसेंबर 2003 : ह्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. तपास अधिकारी सतीश डागर यांनी चौकशी सुरु केली आणि 2005-2006 मध्ये लैंगिक शोषण झालेल्या साध्वीला शोधून काढलं. जुलै 2007 : सीबीआयने प्रकरणाचा पूर्ण तपास करुन अंबाला सीबीआय कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. अंबालावरुन हे प्रकरण पंचकुला सीबीआय कोर्टात ट्रान्सफर केलं. आरोपपत्रानुसार डेरामध्ये 1999 आणि 2001 मध्ये आणखी साध्वींचंही लैंगिक शोष झालं होतं. पण त्यांचा पत्ता लागला नाही. ऑगस्ट 2008 : प्रकरणाचा खटला सुरु झाला आणि डेरा प्रमुख राम रहीमविरोधात आरोप निश्चित करण्यात आले. 2011 ते 2016 : प्रकरणाचा खटला चालला. डेरा प्रमुख राम रहीमकडून वकील सातत्याने बाजू लढवत राहिले. जुलै 2016 :  खटल्याच्या सुनावणीदरम्यान 52 साक्षीदारांचा जबाब नोंदवला. यामध्ये 15 सरकारकडून आणि 37 बचाव पक्षाचे होते. जून 2017 : कोर्टाने डेरा प्रमुख बाबा राम रहीमच्या परदेश प्रवासावर बंदी घातली. 25 जुलै 2017 :  सीबीआय कोर्टाने या प्रकरणात दररोज सुनावणी करण्याचे निर्देश दिले, जेणेकडून लवकरच निकाल लावता येईल. 17 ऑगस्त 2017 : दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपला आणि निकालासाठी 25 ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली.

संबंधित बातमी : बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीम दोषी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget