(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ayodhya Ram Temple : 75 कारागिरांचं काम, भव्य प्रदर्शन..राम मंदिरात भक्तांसाठी काय असणार खास? जाणून घ्या सर्व काही
Ayodhya Ram Temple : जानेवारीमध्ये राम मंदिराचे उद्घाटन केलं जाणार आहे.
Ram Mandir Inauguration : अयोध्येतील राममंदिराच्या (Ram Temple) उद्घाटनाला अवघे काही महिने बाकी आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अधिकाऱ्यांना अयोध्येतील बांधकाम दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार 75 कलाकार मिळून या भव्य मंदिराचं काम पूर्ण करणार आहेत. जानेवारीमध्ये राम मंदिराचे उद्घाटन केलं जाणार आहे.
'द इंडियन एक्स्प्रेसच्या' वृत्तानुसार, गर्भगृहात राम लालाची मूर्ती स्थापनेदरम्यान मंदिर परिसरात एक प्रदर्शनही दाखवण्यात येणार आहे. हे प्रदर्शन 'राम: द मॅन अँड हिज आयडिया' या थीमवर तयार केले जात आहे. ललित कला अकादमीच्या कलाकारांना हे काम 2 आठवड्यांत पूर्ण करण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे. मंदिराच्या उद्घाटनापूर्वी त्यांना हे काम पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 75 कलाकारांपैकी वासुदेव कामथ, धर्मेंद्र राठोड, अद्वैत गडनायक आणि हर्षदर्शन शर्मा यांचीच नावे निश्चित करण्यात आली असून, हे कलाकार भगवान रामावरील प्रदर्शन तयार करणार आहेत.
मंदिर परिसरातच कलाकृती राहतील
प्रदर्शन अकादमीचे अध्यक्ष व्ही नागदास यांनी अयोध्येत मोठा कार्यक्रम आखल्याचे सांगितल्यानंतर कलाकृती मंदिर परिसरातच राहतील. अनेक दशकांच्या संघर्षानंतर राम मंदिराची उभारणी ही प्रत्येक भारतीय नागरिकाच्या आकांक्षांची पूर्तता असल्याचे ते म्हणाले. रामायणातील आदर्शांच्या माध्यमातून प्रेम आणि सामाजिक सौहार्दाच्या तत्त्वांना चालना देण्याचा उद्देश आहे. नागदास यांच्या म्हणण्यानुसार, प्रदर्शनानंतर काही कलाकृती अकादमीच्या कायमस्वरूपी संग्रहात प्रदर्शित केल्या जातील, तर उर्वरित मंदिराच्या आवारात प्रदर्शनात ठेवल्या जातील.
प्रदर्शन 10-14 दिवसांत तयार होईल
व्ही नागदास यांनी सांगितले की, प्रदर्शन तयार करणाऱ्यांची अंतिम यादी अद्याप निवडणे बाकी आहे. प्रदर्शनाच्या तयारीसाठी विविध विचारसरणीचे कलाकार आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ललित कला अकादमीमध्ये संपादक म्हणून काम करणारे दिल्लीस्थित कला क्युरेटर जॉनी एमएल हे प्रदर्शन क्युरेट करणार आहेत. ऑन-साईट प्रकल्प डिसेंबरच्या मध्यात सुरू होईल आणि दोन अॅक्रेलिक-ऑन-कॅनव्हास कलाकृती तयार करण्यासाठी कलाकारांना 10-14 दिवसांचा अवधी दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. आपल्या कलाकारांना जे पौराणिक अनुभव आहेत, ते आपण प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, कलाकारांना रामायणाच्या मंजूर कलाकृती व्यतिरिक्त इतर काहीही प्रदर्शित करण्याची परवानगी नाही.
अकादमीचे अध्यक्ष व्ही नागदास हे स्वतः चित्रकार आणि मुद्रकही आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अकादमी पहिल्यांदाच हा मेगा प्रोजेक्ट करणार आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची अकादमीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी यापूर्वी छत्तीसगढमधील इंदिरा कला संगीत विद्यापीठात व्हिज्युअल आर्ट्स फॅकल्टीचे प्रमुख होते.
महत्त्वाच्या बातम्या :
"पंतप्रधान खरं लपवतायत, चीननं आपली जमीन बळकावलीये"; राहुल गांधींनी पँगॉन्गमध्ये मोदी सरकारला घेरलं