एक्स्प्लोर

Ram Mandir: लोकसभा निवडणुकीपूर्वी जनतेला मोदी सरकारची खास भेट; 6 महिन्याआधीच पूर्ण होणार अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिराचं काम

Ayodhya Ram Mandir: लोकसभा निवडणुकीपूर्वी जनतेला मोदी सरकारची खास भेट. 6 महिन्याआधीच अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिराचं काम

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत (Ayodhya) उभारण्यात येत असलेल्या भव्यदिव्य राम मंदिराचं (Ayodhya Ram Mandir) बांधकाम नियोजित वेळेच्या तीन महिने आधी पूर्ण होण्याची शक्यता आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टशी संबंधित एका अधिकाऱ्यानं शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचे बांधकाम मुदतीपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

रामजन्मभूमी येथील ट्रस्टच्या कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, मंदिराचे काम निर्धारित तारखेच्या तीन महिने आधी पूर्ण होईल, त्यामुळे आता आम्ही डिसेंबर 2023 ऐवजी सप्टेंबर 2023 पर्यंतचा वेळ निर्धारित केला आहे. या नव्या तारखेनुसार, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या जवळपास 6 महिने आधी राम मंदिराच्या उभारणीचं काम पूर्ण होणार आहे."

पहिल्या टप्प्यातील 75 टक्के काम पूर्ण झालंय 

प्रकाश गुप्ता पुढे बोलताना म्हणाले की, "अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराचा गर्भगृह अष्टकोनी असेल. देशातील सर्व भक्तांच्या मनातील भव्यदिव्य प्रभू श्रीरामांचं हे मंदिर आता आकार घेत असल्याचं दिसतंय. या मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे 75 टक्के काम पूर्ण झालं आहे. आता या मंदिरात फक्त 167 खांब बसवण्याचं काम बाकी आहे."

'या' वर्षाच्या अखेरीस काम पूर्ण होणं अपेक्षित 

त्याचवेळी ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा म्हणाले की, "मंदिराचं बांधकाम नियोजित वेळेपूर्वी सुरु आहे. लवकरच गर्भगृहाचे खांब बसवण्याचं काम सुरु होईल." श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की, "अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरु आहे. 2023 च्या अखेरीस या मंदिराच्या मूळ गर्भगृहाचं बांधकाम पूर्ण होणं अपेक्षित आहे." 

त्यानंतर चंपत राय यांनी असंही सांगितलं होतं की, "आम्ही डिसेंबर 2023 मध्ये मंदिर बांधण्याची अंतिम मुदत निश्चित केली आहे आणि जानेवारी 2024 पासून ते प्रत्येक भक्तासाठी खुलं केलं जाईल." दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच ऑगस्ट 2020 रोजी अयोध्येत राम मंदिर उभारणीचं भूमिपूजन केलं होतं. 

मंदिरासाठी देश-विदेशातून देणगी 

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीचं काम जोरात सुरु आहे. यासाठी लोक सढळ हस्ते देणगी देत ​​आहेत. दरम्यान, भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी देण्यात येणाऱ्या रोख देणगीतही वाढ झाली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "राम मंदिरासाठी दिल्या जाणाऱ्या रोख देणगीत तीन पटीने वाढ झाली आहे." ते म्हणाले की, "रामजन्मभूमीत येणारे भाविक मोठ्या प्रमाणात देणगी देत आहेत."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ayodhya Ram Mandir News: अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं काम अंतिम टप्प्यात; पंतप्रधानांच्या हस्ते 'या' दिवशी स्थापन होणार मूर्ती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget